8.5 C
New York
Tuesday, December 10, 2024

Buy now

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत जी दुर्घटना घडली त्याला सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री, अधिकारी जबाबदार

सर्वच कामांची चौकशी करून संबंधीतांवर कारवाई करा 

माजी आमदार परशुराम उपरकर यांची मागणी

कणकवली : मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबतची जी दुर्घटना घडली, त्याला सर्वस्वी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड व बांधकामंत्री रविंद्र चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक अनिकेत पटर्वर्धन जबाबदार आहेत. या दोघांकडूनच संगनमताने कामाचे तुकडे पाहून वाटप करण्यात आले. हीच स्थिती रेल्वे स्टेशनांच्या कामांचीही आहे. त्यामुळे याप्रकरणी या दोघांचीही सखोल चौकशी होऊन कारवाई करण्याची मागणी माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली आहे.

वास्तविक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठीची निविदा ही एकत्रितपणे काढण्याची गरज होती. परंतु तसे केल्यास निविदा प्रक्रिया करावी लागणार असल्याने स्थानिक पातळीवर कामाचे तुकडे पाहून २५ लाखांच्या आत कामे काढून ती वाटण्यात आली. यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झालेला आहे. अशाप्रकारे कार्यवाही करण्यासाठी श्री. सर्वगोड व अनिकेत पटवर्धन यांचाच सहभाग असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. अशाच प्रकारे नौसेनादिनानिमित्त चे हेलिपॅड करण्यात आलेले होते त्यातही मोठ्या प्रमाणात झालेला आहे. यात अगोदर काम करून नंतर निविदा काढण्यात आल्या आहेत त्याचीही चौकशी व्हायला हवी.

अशाचप्रकारे कणकवलीतील रेल्वे स्टेशनच्या कामातही तुकडे पाहून कामांचे वाटप झाले. मुळ टेंडर ज्याला मिळाले, त्याच्या नावे केवळ काम ठेऊन पोट ठेकेदारामार्फत कामे करण्यात आली. याठिकाणी उभारण्यात आलेला तिरंगा झेंडाही आता उत्तरविण्याची नामुष्की आलेली आहे. तसेच श्री. सर्वगोड व श्री. पटवर्धन यांनी अनेक निविदा कामांमध्ये गैरव्यवहार केलेला आहे. अपुरे कागदपत्रे असलेल्या ठेकेदारांनाही कामांचे वाटप करून भ्रष्टाचार करण्यात आला आहे. म्हणून छ. शिवाजी महाराजांच्या पुतळा दुर्घटनेसोबतच श्री. सर्वगोड यांच्या कालावधीत झालेला सर्वच कामांची चौकशी करून संबंधीतांवर कारवाई करा, अशी मागणी श्री. उपरकर यांनी केली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!