कणकवली : तालुक्यातील जानवली मारुती मंदिर नजिक असलेल्या दीक्षा पार्क या अपार्टमेंटमधील तब्बल पाच बंद फ्लॅट चोरट्यांनी फोडल्याची घटना शुक्रवारी सकाळी समोर आली आहे.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक दृष्ट्या पाच फ्लॅट फोडल्याचे समोर आले असून अजून किती ठिकाणी चोरी झाली याबाबतचा तपास सुरू आहे. पोलिसांकडून आजूबाजूच्या परिसराची पाहणी करण्यात येत असून चोरटे पकडण्यासाठी काही पुरवा मिळेल काय याचा शोध घेत आहेत.