12.4 C
New York
Sunday, November 3, 2024

Buy now

सिंधुर्गातील अनेक एसटीच्या फेऱ्या रद्द झाल्याने प्रवाशांना मनस्ताप

मुख्यमंत्र्यांच्या दोन सभेसाठी सिंधुदुर्ग मधून एसटी

विभाग नियंत्रक म्हणतात नोटीस बोर्डावर प्रसिद्धी दिली

कणकवली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रत्नागिरी व कोल्हापूर येथील सभांमुळे सिंधुदुर्गातील एसटीच्या तब्बल १७५ एसटी या सभांकरिता घेण्यात आल्याने सिंधुदुर्गातील विविध एसटी बस स्थानकांवर प्रवाशांचे अक्षरशः हाल झाले. काल बुधवार रत्नागिरी मध्ये एसटी गेल्याने अनेक ग्रामीण भागांमधील एसटी फेऱ्या बंद ठेवण्यात आल्या. यामुळे प्रवाशांना ताटकळत राहावे लागले. तर आज गुरुवारी देखील कोल्हापूर येथील सभेसाठी जिल्ह्यातील आगारांमधून एसटी घेतल्याने अनेक फेऱ्या रद्द झाल्याने उशिरापर्यंत बस स्थानकांवर नागरिक ताटकळत राहिले होते. याबाबत एसटीचे विभाग नियंत्रक अभिजीत पाटील यांच्याशी संपर्क साधला असता बुधवारी रत्नागिरीच्या सभेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १२५ एसटी पाठविण्यात आल्या होत्या. तर गुरुवारी कोल्हापूर येथील सभेसाठी तब्बल ५० एसटी पाठविण्यात आल्याचे सांगितले. दरम्यान याबाबत प्रसिद्धी न केल्याने लोकांना या नियोजनाची माहिती नसल्याने त्रास झाल्याची बाब विभाग नियंत्रक पाटील यांच्या निदर्शनास आणताच त्यांनी नोटीस बोर्डावर सूचना लावली होती. असे प्रशासकीय उत्तर देत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. बुधवारी 125 गाड्या म्हणजे जवळपास एसटीच्या विविध भागांमध्ये जाणाऱ्या ५०० फेऱ्या रद्द करण्यात आल्या. तर गुरुवारी ५० एसटी म्हणजे सुमारे २०० एसटीच्या फेऱ्या रद्द झाल्याने एसटी प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!