सावंतवाडी : मळेवाड कोंडुरे भागातील एका चिरेखाणीत डंपर अपघातात मृत्यू पावलेल्या लहान मुलीच्या मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावल्याची घटना चर्चेत आली होती. यानंतर गुरुवारी रात्री उशिरा त्या अज्ञात डंपरचालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुरुवारी सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने घटनास्थळाची पाहणी केली होती. त्यानंतर आज सावंतवाडी पोलिसांचे तसेच महसूल विभागाचे पथक घटनास्थळी पुन्हा एकदा दाखल झाले असून मृतदेहाचा शोध सुरू आहे.
घटनास्थळी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, नायब तहसीलदार मनोज मुसळे, वैद्यकीय अधिकारी, पोलीस पाटील दिगंबर मसुरकर, त्याचबरोबर दोन महिला पंच व अपघातात मृत्यू पावलेल्या मुलीचे वडील घटनास्थळी उपस्थित आहेत.