सिंधुदुर्ग : अखेर ठरले.! ३१ ऑगस्ट २०२४ पासून म्हणजेच गणेश चतुर्थी पूर्वी सिंधुदुर्ग पुणे विमानसेवेला शुभारंभ होणारआहे. आठवड्यातून दोन वेळा विमान फेरी असेल. शनिवारी सकाळी पुणे वरुन ८.०५ ला विमान सुटून ९.१० वाजता सिंधुदुर्ग ला पोहोचेल सिंधुदुर्ग वरुण ९.३० ला सुटून १०.३५ ला पुणे येथे पोहोचेल. विमान सेवा देणाऱ्या फ्लाय ९१ कंपनीने आपल्या अधिकृत साईट वरुण प्रवाशांना ही माहिती दिली आहे.
चिपी-सिंधुदूर्ग पुणे या रूट साठी अखेर विमानतळ प्राधिकरण आणि संरक्षण मंत्रालय यांनी परवानगी दिली असून गणेश चतुर्थी पूर्वी ही विहेमानसेवा Fly ९१ कंपनी तर्फे सुरु करण्यात येत आहे. सद्या प्रत्येक शनिवार रविवारी चिपी-पुणे-चिपी अशी प्रवासी विमानसेवा सुरु करण्यात येत आहे. याबाबत पुणे विमानतळ येथे स्लॉट उपलब्ध करून मिळणे साठी अडचण येत होती. याबाबत खासदार नारायण राणे यांनी हवाई मंत्री आणि संरक्षण मंत्री यांना पत्र पाठवून लक्ष वेधले होते. या नंतर दोन दिवसा साठी विमान सेवा सुरु करणे चे आदेश देणेत आले. दरम्यान माजी सभापती निलेश सामंत यांनी श्री. राणे भेट घेऊन सदर विमान सेवा संपूर्ण आठवडा भर सुरु करण्या साठी प्रयत्न करण्याची मागणी केली आहे