16.2 C
New York
Monday, October 14, 2024

Buy now

मालवणातील भाजपा पदाधिकाऱ्यांनी रामदास कदम यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला मारले जोडे

मालवण : राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या विषयी रामदास कदम यांनी केलेल्या काही वक्तव्याविषयी मालवण भाजपा पदाधिकाऱ्यांनी तीव्र निषेध नोंदवीत मालवण भाजपा कार्यालय येथे पदाधिकाऱ्यांनी श्री. कदम यांच्या प्रतिकात्मक पुतळयाला जोडे मारले यावेळी कदम यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, संदीप परब, खरेदी विक्री संघ अध्यक्ष राजन गांवकर, शहर अध्यक्ष बाबा मोंडकर, राजन वराडकर,गणेश कुशे, सुधीर साळसकर, अजिंक्य पाताडे, बबलु राऊत, तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, ग्रामीण मंडल प्रभारी आप्पा लुडबे, विलास मुणगेकर, बाळा राऊत, विजय निकम, मंगेश चव्हाण, संदीप भोजणे, राकेश सावंत, ललित चव्हाण, सुशील गावडे, विजय कदम, विलास पांजारी, दत्तात्रय केळुसकर, राम चोपडेकर, दाजी सावजी, जॉन नरोना, दत्ता वराडकर, निलेश पेडणेकर, यांसह अन्य पदाधिकारी उपस्थितीत होते.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी तीव्र स्वरूपात आपल्या भावना व्यक्त करताना यापुढे जशास तसे उत्तर देण्यात येईल असे स्पष्ट केले. दरम्यान, पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत पुतळा हटवला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!