25 C
New York
Friday, July 11, 2025

Buy now

आप्पा लुडबे यांची भाजपच्या मालवण ग्रामीण मंडल प्रभारी पदी नियुक्ती

मालवण : मालवणचे भाजपचे माजी नगरसेवक परशुराम उर्फ आप्पा लुडबे यांची भाजपच्या मालवण ग्रामीण मंडल प्रभारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी लुडबे यांना दिले आहे.

आप्पा लुडबे यांची मालवण ग्रामीण मंडल प्रभारी या भाजपच्या संघटनात्मक जबाबदारीवर नियुक्ती करण्यात आली असून आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रीय, प्रदेश, जिल्हा स्तरावरून वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या सर्व सूचनांप्रमाणे कार्यरत राहावे, तसेच मंडल अध्यक्ष यांच्याशी समन्वयाने निश्चित केलेल्या जबाबदारीच्या कामाला सुरुवात करावी असे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी लुडबे यांना दिलेलगा नियुक्तीपत्रात म्हटले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!