एकावर गुन्हा दाखल ; संशयीत फरारी
कुडाळ : पतीची दारू सोडविण्यासाठी आंबोलीला जाऊया म्हणून सांगून महिलेला बेळगावला नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी संशयित चंद्रकांत सखाराम मराठे (रा घावनाळे बामणादेवी, ता. कुडाळ) याच्यावर वेंगुर्ले पोलीस ठाण्यात शून्य क्रमांकाने गुन्हा दाखल करून तो कुडाळ पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. दरम्यान संशयीत चंद्रकांत मराठे फरारी असून त्याचा शोध सुरु असल्याची माहिती कुडाळ पोलीस ठाण्यातून देण्यात आली.
कुडाळ तालुक्यातील पीडित महिलेने याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयित चंद्रकांत सखाराम मराठे याने पतीची दारू सोडविण्यासाठी आंबोलीला जाऊया म्हणून सांगून आपल्या चार चाकी गाडीतून बेळगाव येथे त्याच्या मित्राच्या घरी तिला नेले. तिथे फिर्यादी झोपेत असताना आरोपीने तिच्यावर अत्याचार केला आणि जिवंत जाळून मारून टाकीन अशी धमकी दिली. तसेच व्हिडिओ बनवून कोणाला सांगितले तर व्हिडिओ सर्वांना पाठविण्याची धमकी सुद्धा दिली. हि घटना दि. २३ जुलै २०२४ रोजी रोजी सायंकाळी ४.४५ ते २४ जुलै २०२४ रोजी पहाटे २ वाजताचे मुदतीत घडली.
या प्रकरणी फिर्यादीने वेंगुर्ले पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असता संशयित कुडाळ तालुक्यातील असल्याने वेंगुर्ले पोलीस ठाण्यात शून्य क्रमांकाने गुन्हा दाखल होऊन तो कुडाळ पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. संशयित चंद्रकांत सखाराम मराठे याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम ३५१ (३),६४ (२) (m)प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या संशयित फरार असून त्याचा शोध घेणायचे काम सुरु आहे, अशी माहिती कुडाळ पोलिसांनी दिली. या प्रकरणी पोलीस उप निरीक्षक श्री. वाघाटे कुडाळ पोलीस ठाणे हे अधिक तपस करीत आहेत.