बांगलादेशातील हिंदू समाजाच्या समर्थनासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात रॅली
कणकवली | मयुर ठाकूर : बांगलादेशामधील आपल्या हिंदू समाजाची काय स्थिती आहे.. हे आपण जाणतो आहोत. बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांविरोधात आणि हिंदू समाजाच्या समर्थनासाठी कणकवली शहरात आज रॅली काढण्यात आली. बांगलादेशी घुसखोरांना देशातून हाकलवा, देश वाचवा, देश वाचवा , भारतातील बांगलादेशी घुसकरांना तात्काळ बांगलादेशात परत पाठवा, हिंदूओपर होनेवाले अत्याचार नही सहेंगे…नही सहेंगे, घर घर ही एकही नारा, बांगलादेशी हिंदू हमारा, बांगलादेशी जिहाद्यांचा निषेध निषेध निषेध अशा घोषणा देत कणकवली पटवर्धन चौक बाजारपेठ झेंडा चौक डीपी रोड मार्गे कणकवली एसटी बस स्थानक पटवर्धन चौक पर्यंत निषेध रॅली काढून घोषणा देण्यात आल्या.
बांगलादेशी घुसकोरांना तात्काळ बांगलादेशात परत पाठवा, हिंदूओपर होनेवाले अत्याचार नही सहेंगे…नही सहेंगे, घर घर ही एकही नारा, बांगलादेशी हिंदू हमारा अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
यावेळी कणकवली शहरात आणि नाक्या – नाक्यांवर पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. डी वाय एस पी घनश्याम आढाव यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक मारुती जगताप, पोलीस उपनिरीक्षक बापू खरात, पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मुंडे, आरसीपी आणि ट्रेकिंग फोर्स असा शंभर पोलिसांचा ताफा यासाठी सज्ज होता.
यावेळी रॅलीत दत्ताप्रसाद ठाकूर बजरंगदल जिल्हाध्यक्ष, अभिजीत राणे, सुनिल सावंत, किशोर दाभोळकर, प्रतिभा करंबेळकर, सी .आर .चव्हाण, प्रदीप हरमलकर , राजश्री धुमाळे, प्रकाश सावंत, भाजप तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, मिलिंद मेस्त्री, कमलेश पाटील, महेश सापळे आदी सहभागी झाले होते.