10.5 C
New York
Friday, November 8, 2024

Buy now

माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेमार्फत मतदान जनजागृती

कणकवली : कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, श्री. मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड काॅमर्स कनेडी, श्री. तुकाराम शिवराम सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ सायन्स कनेडी, बालमंदिर कनेडी प्रशाले अंतर्गत वार शुक्रवार दिनांक १६ ऑगस्ट २०२४ रोजी कनेडी बाजारपेठेत मतदान जनजागृती अभियान राबविण्यात आला.

मतदान प्रचार आणि प्रसार व निवडणूक साक्षरता या विषयी नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण होण्यासाठी तहसीलदार कार्यालय कणकवली आणि माध्यमिक विद्यामंदिर कनेडी यांच्या संयुक्त विद्यमाने कनेडी बाजारपेठेत मतदान जनजागृती रॅली व मतदार साक्षरता पथनाट्य सादरीकरण करण्यात आले.

या मतदान जनजागृती मध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या अमूल्य मता संदर्भात घोषणा व दर्जेदार प्रकारे पथनाट्य सादरीकरण केले.

अभियानामध्ये प्रमुख उपस्थिती निवडणूक नायब तहसीलदार कार्यालय कणकवली सन्मा. प्रिया हर्ने मॅडम, मंडळ अधिकारी सांगवे सन्मा.फर्नांडिस मॅडम, सांगवे , भिरवंडे, कुंभवडे गावचे तलाठी समृद्धी गवस, श्रेया शिंदे , श्री.व्ही.एस.रासम, सांगवे, नरडवे गावचे कोतवाल श्री. प्रकाश कदम, श्री. विजय यादव,सांगवे गावचे पोलीस पाटील श्री. दामोदर सावंत, डॉ.पटेल तसेच शालेय समिती चेअरमन मा.श्री.आर.एच. सावंत, शालेय समिती सदस्य मा.श्री. चंद्रशेखर वाळके, मा.श्री. बावतीस घोन्सालवीस, प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य मा.श्री. सुमंत दळवी,पर्यवेक्षक मा.श्री. बयाजी बुराण, प्रशालेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, मतदान जनजागृती करणारे विद्यार्थी, पथनाट्य सादरीकरण करणारे विद्यार्थी व स्काऊट गाईड चे विद्यार्थी व बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!