-0.2 C
New York
Saturday, February 15, 2025

Buy now

आंबोली मान्सून मॅरेथॉनमध्ये पाचशेहून अधिक स्पर्धकांचा सहभाग

आंबोली सरपंच आणि सह्याद्री ॲडव्हेंचर अँड रेस्क्यू टीमतर्फे आयोजन

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. रवींद्र चव्हाण आणि खासदार नारायण राणे यांच्या मार्गदर्शनातून शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या या भव्य आंबोली मान्सून मॅरेथॉन पहाटे ६ वाजता स्पर्धक आणि क्रीडारसिक यांच्या प्रचंड उपस्थितीत संपन्न झाली. या मॅरेथॉन स्पर्धेचा शुभारंभ भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री. विशाल परब यांच्या शुभहस्ते करण्यात आला. ही स्पर्धा दोन टप्प्यात घेण्यात आली होती. यातील पहिला टप्पा २१ किलोमीटरचा तर दुसरा ६ किलोमीटरचा ठेवण्यात आला होता. या दोन्ही गटात मिळून पाचशेपेक्षाही अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. पहाटेच्या धुक्यात दौडणाऱ्या स्पर्धकांमुळे आज आंबोली उत्साहाने सळसळत असल्याचे चित्र दिसून आले.

यावेळी आंबोली रेस्क्यू टीमचे बाबल आल्मेडा, आंबोली सरपंच सौ. सावित्री पालेकर, ॲड. अनिल निरवडेकर, माजी नगरसेवक राजू बेग, सुधीर आडिवरेकर, माजी जि. प. सदस्य पंढरी राऊळ, संतोष पालेकर, दिलिप भालेकर, केतन आजगांवकर, उत्तम नार्वेकर, आंबोली ग्रा. पं. सदस्य सौ. छाया नार्वेकर, कोजमा डिसोजा, मायकल डिसोजा, दोडामार्ग येथील भाजपा पदाधिकारी रंगनाथ गवस, दोडामार्ग मिडियाचे शिरीश नाईक, मोरगाव सरपंच संतोष आईर, प्रविण गवस, अंकुश नाईक, सर्वेश पालकर, रविंद्र देसाई, दोडामार्ग तालुका कृषी आघाडी प्रमुख मनोहर देसाई, संजय उसपकर, जितू गावकर, विनायक ठाकूर, लायन्स क्लब अध्यक्ष अमेय पै, शक्ती केंद्र प्रमुख बंटी जामदार, मंदार पिळणकर, धिरेंद्र म्हापसेकर, बुथ अध्यक्ष विराग मडकईकर, अमित गवंडळकर, नागेश जगताप, आडेली सरपंच परेश हळदणकर, बोवलेकर सर, प्रशांत नाईक, साईप्रसाद नाईक, आबा एरम, राकेश धावडे, विष्णू कुबल, गणेश पडते, काका भिसे, प्रदिप जाधव, जोस्ना कर्पे, गजानन कर्पे, पुंडलीक कदम तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

२१ किलोमीटर टप्प्याच्या स्पर्धेत पुरुष गटातून सिद्धेश बारजे तर महिला गटातून दीपिका चौगुले विजेती ठरली. ६ किलोमीटर टप्प्याच्या स्पर्धेत १८ वर्षाखालील मुलांच्या गटात ऋतिक वर्मा तर मुलींच्या गटातून आयुष्या राऊळ हे विजेते ठरले. १८ वर्षावरील पुरुष गटात ओंकार बायकर तर महिला गटात वैष्णवी चौधरी विजयी ठरल्या.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!