पहिल्याच श्रावण सोमवारच्या मुहूर्तावर प्राणप्रतिष्ठापणा सोहळा
आचरेकर कुटुंबीयांचे ब्राह्मणदेव सेवा मंडळाने मानले आभार
कणकवली : असलदे उगवतीवाडी येथील जागृत देवस्थान श्री ब्राम्हणदेव मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा व प्राणप्रतिष्ठापणा सोहळा ५ ऑगस्ट २०२४ रोजी श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारच्या मुहूर्तावर पार पडला. या ठिकाणी आचरेकर कुटुंबीयांनी दिलेल्या आर्थिक मदतीमधून मंदिर उभारण्यात आले व मंदिराची सुंदर वास्तू उभी राहिली.त्याबद्दल ब्राम्हणदेव सेवा मंडळाच्यावतीने आचरेकर कुटुंबीयांचे आभार मानण्यात आले.
ब्राम्हणदेव मंदिर कै. सदाशिव शंकर आचरेकर,कै. अंकुश शंकर आचरेकर,श्री. अशोक शंकर आचरेकर,श्री. रवीन शंकर आचरेकर, श्री. शरद शंकर आचरेकर व आचरेकर कुटुंबीयांनी पुन्हा मंदिर जिर्णोद्धारासाठी संपूर्ण आर्थिक हातभार लावण्यात आला.
या बांधकामाचा शुभारंभ २१ एप्रिल २०२४ रोजी करण्यात आला होता.जिर्णोद्धार ५ ॲागस्ट रोजी झाला म्हणजेच या मंदिराचे काम १०५ दिवसात करण्यात आले. ब्राम्हणदेव मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हे काम पूर्णत्वास गेले . नव्या मंदिरात सोमवारी सकाळपासूनच धार्मिक विधी पार पडला. या जिर्णोद्धार सोहळ्याला आचरेकर कुटुंबातील सदस्यांनी हजेरी लावली होती.यावेळी कलश पूजन झाल्यानंतर आचरेकर कुटुंबियांच्या हस्ते हा कलश स्थापन करण्यासाठी नेण्यात आला.तसेच आचरेकर कुटुंबियांच्या मंदिर उभारण्यात दिलेल्या योगदानाबद्दल आचरेकर कुतुबियांच्या नामफलकाचे अनावरण चंद्रकांत जेठे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी नितीन सदशिव आचरेकर ,अशोक शंकर आचरेकर,अश्विनी अशोक आचरेकर,जावई श्री.परब आदीसह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
त्यानंतर श्री ब्राम्हणदेव मंदिरात प्राणप्रतिष्ठापना मंदिरात करण्यात आला. त्यानंतर उपस्थित भाविकांनी दर्शन घेतले .आणि सर्व भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला. यावेळी हर.. हर महादेव..चा जयघोष करण्यात आला.यावेळी भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.