दहावी – बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा केला गौरव..
मालवण : विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे न लागता कृषीक्षेत्रातील नवनवीन संकल्पना आत्मसात करुन आधूनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कृषीक्षेत्राचा विकास करण्याचे आवाहन रत्नागिरी येथील कृषीतज्ञ गजानन रानडे यांनी आचरा येथे केले.न्यू इंग्लिश स्कूल आचरा येथे आयोजित आदर्श विद्यार्थी विद्यार्थीनी गुणगौरव समारंभात ते बोलत होते.
यावेळी त्यांच्या सोबत व्यासपीठावर मालवणचे गटविकास अधिकारी आत्मज मोरे, धी आचरा पीपल्स असोशिएशन संस्थेचे अध्यक्ष डॉ प्रदिप मिराशी, कार्याध्यक्ष प्रदिप परब मिराशी, सचिव अशोक पाडावे, इक्बाल काझी, रघुनाथ पाटील स्थानिक स्कूल समिती पदाधिकारी, सदस्य, मुख्याध्यापक गोपाळ परब यांच्या सह अन्य शिक्षक आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना गटविकास अधिकारी आत्मज मोरे यांनी स्पर्धा परीक्षेचे महत्व स्पष्ट करताना यु पी एस सी, एम पी एस सी चा अभ्यास पदवी नंतर करण्याऐवजी शालेय स्तरापासूनच करावा तसेच सामान्य ज्ञान वाढविण्यासाठी वाचन समृद्ध करावे असे मत व्यक्त केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते आदर्श विद्यार्थी विद्यार्थीनी, दहावी- बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला गेला. यावेळी प्रास्ताविक संस्थेचे कार्याध्यक्ष व इनामदार श्री देव रामेश्वर देवस्थान न्यासाचे नूतन अध्यक्ष प्रदिप परब मिराशी यांनी केले कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मधुरा माणगांवकर यांनी तर आभार परब सर यांनी मानले