26 C
New York
Sunday, September 15, 2024

Buy now

युवा संदेशच्या एसटीएस परीक्षेचा निकाल ३ एप्रिल रोजी

कणकवली | मयुर ठाकूर : युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च (एसटीएस) परीक्षेचा निकाल ३ एप्रिल रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित एसटीएस परीक्षेचे ७ वे वर्ष असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात २६ परीक्षा केंद्रावर ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. सिंधुदुर्ग जिल्हातून १०,४६७ विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. दुसरी, तिसरी, चौथी, सहावी व सातवी या प्रत्येक इयत्तेतील पहिल्या ५० अशा २५० गुणवंत विद्यार्थ्यांना अडीच लाख रुपयांची रोख पारितोषिके सन्मानचिन्ह, मेडल्स व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच चौथी, सहावी व सातवी या प्रत्येक इयत्तेतील टॉप फाईव्ह गुणवंत विद्यार्थ्यांना विमानाने भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला ( भेट देण्याची संधी मिळणार आहे. तर दुसरी, तिसरीच्या टॉप फाईव्ह विद्यार्थ्यांना गोवा येथील सायन्स सेंटरला भेटीसाठी नेण्यात येणार आहे. तसेच गुण १५२ ते २०० सुवर्णपदक, गुण १३२ ते १५० रजत पदक व गुण ११२ ते १३० कांस्यपदक देऊन गौरविण्यात येणार आहे.

३ एप्रिल रोजी संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या ५० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात दुपारी ३ वा. सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात येणार आहे. निकाल पाहण्यासाठी https://bit.ly/ sts2024result या लिंक वर बैठक क्रमांक नोंद करून निकाल पाहता येईल. उत्तरपत्रिका ओएमआर पद्धतीची असल्याने संगणकाद्वारे तपासली जाणार असून निकालादिवशी पालक / शिक्षक / विद्यार्थी यांना निकाल व सोडवलेली उत्तरपत्रिका ऑनलाईन पाहता येणार आहे. ३ ते ६ एप्रिल २०२४ अखेर हरकती स्वीकारल्या जातील. त्यानंतर ७ एप्रिल रोजी अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल.

यावर्षी सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर व ठाणे जिल्हात आयोजित करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी एसटीएस परीक्षाप्रमुख सुशांत सुभाष मर्गज (९४२०२०६३२६) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन युवा संदेश प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत आणि अध्यक्षा संजना सावंत यांनी केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!