24.5 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

हळवल शिवजयंती मंडळाचा आदर्श व्यक्तिमत्व पुरस्कार बाळासाहेब भाटकर यांना प्रदान

कणकवली | मयुर ठाकूर : शिवजयंती उत्सव मंडळ, हळवलच्यावतीने गेली ३५ वर्षे शिवजन्मोत्सव साजरा केला जातो. गेली १४ वर्षे कै. दत्तात्रय उर्फ दादा चव्हाण स्मरणार्थ समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला राजू राणे व सौ. राखी राणे पुरस्कृत आदर्श व्यक्तिमत्त्व पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यावर्षी कणकवली येथील वर्कशॉप गणपती मंदिर येथे मनोभावे सेवा करणारे बाळासाहेव भाटकर यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले.

शिवसेनेचेउपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये व ज्येष्ठ नाट्यकर्मी शाम नाडकर्णी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिवजयंतीनिमित्त श्री सत्यनारायण महापूजा, हरिपाठ, दशावतारी नाटक असे कार्यक्रम आयोजित केले होते.उत्सवास आ. वैभव नाईक, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभाप्रमुख सतीश सावंत, युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी भेट दिली. पुरस्कार प्रदान कार्यक्रमास माजी सभापती मधुकर सावंत, शिवसेना उपतालुकप्रमुख राजू राणे, माजी सरपंच भास्कर गावडे, सौ. स्मिता परब, शंकर राणे, प्रभाकर राणे, ग्रा.प.सदस्य अनंत राणे, युवासेना विभागप्रमुख रोहित राणे, विजय परव, आप्पा ठाकूर, सुभाष राणे, गणेश राणे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन उमेश परब यांनी केले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!