वाहतूक झाली ठप्प ; गॅस एजन्सीकडे जाणारा रस्ता बंद
कणकवली : तालुक्यातील वागदे केटी बंधारा येथे मराठा मंडळ नजिक झाड उन्मळून रस्त्यावर पडले होते. त्यामुळे येथील मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. तसेच नजीकच असलेल्या गॅस एजन्सीच्या गेटजवळच झाड पडल्याने गॅस नेण्यासाठी आलेल्या ग्राहकांचेही हाल झाले होते.