सिंधुदुर्ग : गेल्या पंधरा वर्षात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी बोल बच्चनगिरी करून जनतेला फसवण्याचे काम केले.त्यांनी जनहिताचे एक तरी काम दाखवावे अन्यथा मी गावा गावात जाऊन टराटरा बुरखा फाडणार असा इशारा माजी आमदार राजन तेली यांनी आज येथे दिला.
दरम्यान युती धर्माबाबत केसरकर यांनी मला शिकू नये ,मला जो काय आदेश द्यायचे आहे ते मला वरिष्ठ देतील,परंतु तुमच्या विरोधात यादी बोलायचं कोण धाडस करत नव्हते ते आता मी करणार असा इशाराही त्यांनी यावेळी दिला श्री तेली आज आपल्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.