22.5 C
New York
Monday, July 22, 2024

Buy now

मालवण आपत्कालीन गृपच्या सदस्यांनी पाण्यात अडकलेल्या २० जणांची केली सुटका ; ज्येष्ठ महिलेचा समावेश

मालवण : धुव्वाधार पावसामुळे हुमरमळा ओरोस परिसरात जलमय स्थिती निर्माण झाली. अनेकजण पाण्यात अडकले. यावेळी प्रशासन व मालवण आपत्कालीन गृपने तिथे पोहचत पाण्यात अडकलेल्या २० जणांना सुखरूप बाहेर काढले. यात एका ज्येष्ठ महिलेचा समावेश आहे.

आज रविवारच्या तुफानी पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी घुसल्याने आपत्कालीन स्थिती निर्माण झाली. मुंबई गोवा महामार्गावरील कुडाळ हुमरमाळा परिसरात मोठया प्रमाणात पाणी वाढले. यावेळी शेतात काम करणारे १५ शेतकरी अडकून पडले. तर ओरोस फाटा या ठिकाणी काही घराच्या चारही बाजूने पाणी वाढल्याने एका ज्येष्ठ महिलेसह काही व्यक्ती अडकल्या होत्या.

दरम्यान प्रशासकीय आपत्कालीन यंत्रणा व मालवण येथील आपत्कालीन गृप त्या ठिकाणी पोहचले. बचाव कार्यासाठी होडी व सुरक्षा साहित्य आणले गेले. पाण्यात अडकलेल्या १५ शेतकऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. तसेच एका घरात अडकून पडलेल्या ज्येष्ठ महिलेला आणि एका घरात अडकलेल्या चार सदस्यांनाही सुखरूप बाहेर काढण्यात आले.

बचाव पथक मध्ये मालवण येथील आपत्कालीन गृपचे दामू तोडणकर, रोहित आडकर, संकेत जाधव, चेतन मोंडकर, यश देसाई, ओंकार देवूलकर, नितीन तोडणकर, गणेश पांगे, सिद्धेश कदम, महेश, सुमित मांजरेकर, साहिल कुबल, संकेत जाधव, हर्ष बांदकर सहभागी होते. आपत्कालीन स्थितीत जनतेच्या सेवेसाठी आम्ही तत्पर राहणार असल्याचे दामू तोडणकर यांनी माहिती देताना सांगितले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!