सिंधुदुर्ग : रविवारी ७ जुलैला झालेल्या अतिवृष्टीमुळे सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे या परिस्थितीत पुढील काही तास अतिवृष्टीची शक्यता पाहता शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आठ जुलै सोमवारी एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे.
याबाबतची घोषणा त्यानी सावंतवाडी येथे एका कार्यक्रमादरम्यान केली. अतिवृष्टीमुळे सर्वत्र ठिकाणी पाणीच पाणी झाले असून नदी नाले भरून वाहत आहेत. त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीमध्ये मुलांना शाळेमध्ये पाठवू नये, शाळेला सुट्टीची घोषणा शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी केली.