डॉ. पंकज पाटील यांची माहिती ; यापुढे रुग्णांना चांगली सेवाही मिळणार
कणकवली : मागील काही दिवसांपासून कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील काही वॉर्ड चे दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यामुळे काही दिवस रुग्णालयातील पुरुष कक्ष, ऑपरेशन थिएटर त्याचबरोबर इतर काम देखील सुरू होती. दुरुस्तीनंतर सध्याच्या परिस्थितीत आता ऑपरेशन थिएटर आणि काम सुरू असल्याने बंद असलेला पुरुष कक्ष मंगळवार पासून सुरू झाला असून आता बेडअभावी रुग्णांची होणारी गैरसोय आता थांबणार आहे.
तसेच उपचारासाठी तज्ञ डॉक्टर देखील उपलब्ध झाल्याने रुग्णसेवेत यानंतर तफावत निर्माण होणार नसल्याचेही डॉ. श्री. पाटील यांनी सांगितले. तसेच स्त्री रोग तज्ञ नसल्याने मोठ्या समस्येत अडकलेल्या उपजिल्हा रुग्णालयात आता डॉ. नित्यानंद मसुरकर हे स्त्रीरोग तज्ञ म्हणून उपलब्ध झाल्याने आता प्रसूतीच्या बाबतीत देखील रुग्णांना समस्या निर्माण होणार नाही असेही ते म्हणाले.