कणकवली : कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणूकीसाठी आज मतदान होत असून कणकवली नगरपंचायत चे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी नगरसेविका सुप्रिया नलावडे या दाम्पत्याने आपला मतदानाचा हक्क बजावला.
कणकवली तहसीलदार कार्यालय इमारत येथील मतदान केंद्रावर जात नलावडे दाम्पत्याने आपले मतदान केले. कणकवली शहरात एकूण १ हजार ३४१ मतदार असून त्यापैकी १ हजार मतदान हे महायुती चे उमेदवार निरंजन डावखरे याना होईल असा विश्वास समीर नलावडे यांनी व्यक्त केला. निरंजन डावखरे हे रेकॉर्डब्रेक मताधिकक्याने विजयी होतील असेही नलावडे म्हणाले.