आंबोली : गेले २ दिवस जोराने सुरू असलेला पाऊसाने दांडी मारल्याने आंबोलीचा मुख्य धबधबा संथ गतीने वाहत होता. त्यामुळे त्या ठिकाणी आलेल्या पर्यटकांचा हिरमोड झाला तर दुसरीकडे आंबोली धबधब्यावर जाण्यासाठी आज वनविभागाकडून १० रुपये कर आकारणी करण्यात आली. त्यामुळे याबाबत काही पर्यटकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. दुसरीकडे पाऊस किरकोळ असला तरी त्या ठिकाणी पर्यटकांची संख्या मोठी होती. यावेळी गोव्यासह कोल्हापूर, बेळगाव येथील पर्यटक मोठ्या प्रमाणात होते तर सायंकाळी उशिरा कावळे ७ पॉईंटवर मोठी गर्दी होती. अति उत्साही पर्यटक रस्त्या राहून धागडधिंगा घालताना दिसत होते. मात्र पोलीस यंत्रणेचे त्याकडे दुर्लक्ष होते.