23.7 C
New York
Thursday, July 25, 2024

Buy now

कणकवली शिवाजीनगर – परबवाडी येथे रस्त्यावर फिरणाऱ्या एका इसमाकडे मंदिरातील सामान सापडले

सदर इसमाकडे सापडली कणकवली दत्त मंदिर बांधकरवाडी येथील मंदिराची मोठी घंटा

ग्रामस्थ व पोलीस घटनास्थळी दाखल ; चोरी केल्याचा संशय

कणकवली : तालुक्यातील परबवाडी शिवाजीनगर येथे रस्त्यावर फिरणाऱ्या एका इसमाकडे मंदिरातील मोठ्या ३ मोठ्या घंटा व पूजेची निरंजन व किरकोळ सामान सापडले. येथील नागरिकांना संशय आल्याने त्याला रस्त्याच्या बाजूला थांबवून येथील नागरिकांनी जेव्हा पिशव्या ओतल्या. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान लागलीच नागरिकांनी कणकवली पोलीस ठाण्याशी संपर्क केला. काही क्षणातच पोलीस घटनास्थळी दाखल देखील झाले.

सदरचा इसम हा आपलं नाव प्रमोद मिसाळ असून आपण उस्मानाबाद येथून आलो असे सांगत आहे. तसेच आपल्याला कोणीतरी फसवलं आहे असेही तो सांगत होता. तर आपल्या सोबत दुसरा माणूस देखील होता आणि त्याने आपणास १ हजार रुपये देतो…सामान मला दे असे सांगितले आहे. नागरिकांनी पकडल्यावर तो मला इथे टाकून पसार झाला असं देखील सदर इसमाने पोलिसांना सांगितले.

मात्र मागील अनेक दिवस कणकवली शहरात वाढत्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर हा धक्कादायक प्रकार उघड झाल्याने कणकवली शहरात खळबळ उडाली आहे.

घटनेची माहिती मिळताच एलसीबीचे राजू जामसांडेकर, पीएसआय आर बी शेळके, पोलीस हवालदार खंडे, कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार घाडीगावकर, महिला पोलीस प्रणाली जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली व सदर इसमास ताब्यात घेतले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!