फोंडाघाट : सह्याद्रीच्या दर्या- खोऱ्यात आणि फोंडाघाट परिसरात पडणाऱ्या संततधार पावसामुळे नद्या नाल्याना आणि ओढ्यांना पुराचे स्वरूप प्राप्त झाले असून रस्ता रुंदीकरणानंतर रस्त्यावरून नदीसदृश्य पाणी वाहत आहे. तर एस टी स्टँडवर प्लॅटफॉर्म पर्यंत पाणी पोहोचल्याने प्रवासी- ग्राहक- वृद्ध यांचे अतोनात हाल झाले आहेत. मात्र शेतकरी शेतीच्या कामांमध्ये व्यस्त झाला आहे.