22.3 C
New York
Monday, July 22, 2024

Buy now

दुचाकी व एसटी बस यांच्यात हडी येथे अपघात | तरुणाचा मृत्यू

मालवण : दुचाकी व एसटी बस यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात गुरुवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हडी येथे झाला. शिवाजी लक्ष्मण सुर्वे (वय २८) रा. हडी जठारवाडी असे मृत तरुणाचे नाव आहे.

मालवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एसटी आगाराची मालवण-तांबळडेग (क्रमांक- एम एच-१४ बीटी -१७७९) ही बसफेरी जात असता हडी रस्त्यावर समोरून आलेल्या दुचाकी (क्रमांक एम एच ०७- एम- ०९७२) ची जोरदार धडक बसली. यात दुचाकीस्वार शिवाजी सुर्वे याचे डोके एसटी बसच्या पुढील भागास आपटल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीचचे पूर्णपणे नुकसान झाले. एसटी बस च्या समोरचा भाग आत गेला होता यावरून अपघाताची गंभीरता दिसत होती. अपघाताची माहिती एसटीचे चालक धर्मांण्णा मौला नडगिरी यांनी पोलीस ठाण्यात फोनद्वारे कळविली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक नांदोसकर, पोलीस हेडकॉन्स्टेबल हेमंत पेडणेकर व पोलीस कॉन्स्टेबल प्रतीक जाधव यांनी घटनास्थळी जात अपघाताचा पंचनामा केला. अपघातात मृत्यू पावलेल्या शिवाजी सुर्वे याचा मृतदेह विच्छेदन करण्यासाठी मालवण ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले होते. एसटी प्रशासन अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले होते. शिवाजी लक्ष्मण सुर्वे यांच्या अपघाती मृत्यू नंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत होती.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!