27 C
New York
Saturday, July 5, 2025

Buy now

भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, कलमठ सरपंच संदिप मेस्त्री यांना पितृशोक

जिल्हा बँक सेवानिवृत्त कर्मचारी चंद्रकांत मेस्त्री यांचे निधन

कणकवली : कणकवली भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, कलमठ सरपंच तथा भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदिप मेस्त्री यांचे वडील चंद्रकांत बाळकृष्ण मेस्त्री ( वय ६५, रा कलमठ, सुतारवाडी) यांचे अल्पशा आजाराने कणकवली येथील खाजगी रुग्णालयात ११ जून रोजी सायंकाळी दुःखद निधन झाले. चंद्रकांत मेस्त्री यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याचे समजताच आमदार नितेश राणे यांनी तात्काळ आपला दौरा अर्धवट टाकून रुग्णालयात धाव घेतली. डॉक्टरांनी मेस्त्री यांना वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. मात्र त्यांना यश आले नाही. चंद्रकांत मेस्त्री हे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे सेवानिवृत्त कर्मचारी होते. दुपारी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे कणकवलीत खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र सायंकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालावली. अत्यंत धार्मिक वृत्तीचे असलेले चंद्रकांत मेस्त्री हे सर्वांशी सलोख्याचे संबंध राखून होते. त्यांच्या पश्चत आई, पत्नी, दोन मुलगे, सूना, भाऊ, वहिनी, पुतणे, नातवंडे असा मोठा परिवार आहे. चंद्रकांत मेस्त्री यांच्या निधनाचे वृत्त समजताच हळहळ व्यक्त होत असून कलमठ गावावर शोककळा पसरली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!