29.7 C
New York
Tuesday, June 18, 2024

Buy now

जिल्हा पत्रकार भवनासाठी ४७ लाखाचा निधी मंजूर – उमेश तोरसकर

सोलर पॅनल समवेत कॅन्टीनसाठी खर्च करणार

ओरोस : पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या भवनासाठी तब्बल ४७ लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्हा नियोजन मधून हा निधी देण्यात आला असून त्या माध्यमातून सोलर पॅनल आणि भवनात कॅन्टीन सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर यांनी दिली. यात सोलर पॅनलसाठी २० लाख ४० हजार, कॅन्टीन साठी १८ लाख, एसी साठी ९ लाख ४० हजाराचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाने सोलर पॅनल, टॉवर एसी व कॅन्टींग साठी सातत्याने पालकमंत्री रविंद्र चव्हाण, खासदार नारायण राणे, आमदार वैभव नाईक, आमदार नितेश राणे व जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार तब्बल ४७ लाखाचा निधी मंजूर झाला असून कामे पूर्णत्वास जात आहेत. तसेच यासाठी जिल्हा नियोजन अधिकारी श्री. बुधावळे, श्री. पवार व बांधकाम कार्यकारी अभियंता सर्वगोड यांचेही सहकार्य लाभले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!