26.4 C
New York
Saturday, September 14, 2024

Buy now

मुसळधार पाऊस | घराचे छप्पर कोसळले

देवगड : देवगड मध्ये शनिवारी पावसाने जोरदार धुमाकूळ घातला पाऊस सुरू झाल्यानंतर प्रथमच पावसाने दीडशे चा टप्पा ओलांडला असून रविवारी सकाळी १५८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. शनिवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे वेळवाडी येथील राजन भिकाजी दहीबावकर यांच्या घराच्या छपराचा काही भाग कोसळून दहिबावकर यांचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक,उपतालकप्रमुख बुवा तारी यांनी वेळवाडी येथील दहिबावकर यांच्या निवासस्थानी सोमवारी जात घराची पाहणी केली. यामध्ये दहिबावकर यांच्या छपराचा काही भाग कोसळून मोठे नुकसान झाले आहे. पावसाचा जोर कायम असल्यामुळे घरातील जीवनावश्यक वस्तू भिजल्यामुळे त्याचे देखील नुकसान झाले आहे.

रविवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास मुसळधार पाऊस सुरू असताना अचानक घराच्या छपराचा काही भाग कोसळला दैव बलवंत असल्यामुळे घरातील कोणालाही दुखापत झाली नाही मात्र दहिबावकर यांचे मोठे नुकसान झाले आहे.यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक,उपतालकप्रमुख बुवा तारी यांनी दहिबावकारांना छप्पर दुरुस्तीसाठी मदत करू असे आश्वासन दिल्यामुळे दहिबावकर यांनी नाईक यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानले.यावेळी उपतालकप्रमुख बुवा तारी, युवासेना उपजिल्हाप्रमुख निनाद देशपांडे , मळई शाखाप्रमुख बाळा कणेरकर आदी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!