29.7 C
New York
Tuesday, June 18, 2024

Buy now

तळाशील येथे होडी उलटली | मच्छिमार बेपत्ता ; कोस्टगार्ड हेलिकॉप्टरद्वारे शोध सुरू

मालवण : तळाशील येथे खाडीपात्रात शनिवारी रात्री होडी उलटल्याने पाण्यात बुडून बेपत्ता झालेल्या किशोर महादेव चोडणेकर या मच्छिमारांचा शोध सूरू आहे. दरम्यान, सोमवारी जिल्हाधिकारी किशोर तावडे, पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी मालवण सर्जेकोट येथे दाखल शोध मोहिमेचा आढावा घेतला.

दरम्यान, दोन दिवस उलटले तरीही बेपत्ता मच्छिमार किशोर महादेव चोडणेकर याचा शोध न लागल्याने कोस्टगार्डला माहिती देण्यात आली. त्यानुसार हेलिकॉप्टर द्वारे शोध मोहीम घेण्यात आली. मात्र किशोर याचा शोध लागला नाही. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांनी शोध मोहिमेचा आढावा घेतला त्या वेळी तहसीलदार वर्षा झालटे, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे तसेच प्रशासकीय अधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते. तळाशील येतील किशोर महादेव चोडणेकर  हे आपला मुलगा लावण्य किशोर चोडणेकर (वय १४ ) वर्षे आणि खालशी धोंडीराज परब (वय ५५ ) राहणारा तारकर्ली हे तळाशील खाडीमध्ये छोटी होडी घेऊन मासेमारीसाठी गेले होते. सदर मच्छीमार आपल्या बोटीसहित सर्जेकोट तळाशील येथे मच्छीमारी करत असताना रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास होडी उलटले. तीनही जण समुद्रात बुडाले. मात्र लावण्य हा पोहून बाहेर आला आणि बचावला. तर बेपत्ता धोंडीराज यांचा मृतदेह रविवारी सापडला. त्या नंतर किशोर यांच्या शोधासाठी शोध मोहीम सूरू आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!