29.7 C
New York
Tuesday, June 18, 2024

Buy now

व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी नशाबंदी मंडळ प्रयत्नशील

अमोल मडामे व वर्षा विद्या विलास यांची माहिती

कणकवली | मयुर ठाकूर : मतपरिवर्तन व समजुतीच्या मार्गाने व्यसनांच्या चक्रव्यूहात अडकलेल्या व्यक्तींना व्यसनांतून बाहेर काढणे व व्यसनमुक्त झालेल्या व्यक्तींना पुन्हा व्यसनांच्या आहारी न जाऊ देणे हा उद्देश नशाबंदी मंडळाचा आहे. समाजामध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करण्यासाठी नशाबंदी मंडळातर्फे विविध उपक्रम राबविले जात असून सोशल मीडियाद्वारे प्रभावीपणे व्यसनमुक्तीबाबत जनजागृती केली जात आहे. व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी नशाबंदी मंडळ अहोरात्र मेहनत घेत आहे, अशी माहिती नशाबंदी मंडळाचे सचिव अमोल मडामे व सरचिटणीस वर्षा विद्या विलास यांनी दिली.

वागदे येथील गोपुरी आश्रमाच्या बहुउद्देशीय सभागृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत श्री. मडामे व वर्षा विद्या विलास बोलत होत्या. यावेळी बाॅस्को डिसोझा, बिसमिल्ला सय्यद, अर्पिता मुंबरकर अादी उपस्थित होते. मडामे म्हणाले, व्यसनाधिनतेची नवीनवीन आव्हाने समाजासमोर उभी ठाकली आहेत. ही आव्हाने पेलण्यासाठी नशाबंदी मंडळ सज्ज आहे. तरुण पिढीमध्ये व्यसनाधिनतेचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या पिढीला व्यसनांतून बाहेर काढणे हे मोठे आव्हान आहे. हे आव्हान नशाबंदी मंडळाने स्वीकारून या पिढीला व्यसनांतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करीत आहे. व्यसनांच्या चक्रव्यूहात अडकेल्या लोकांना मतपरिवर्तनातून आणि समजुतीच्या मार्गाने मुक्त करणे व पुन्हा एकदा या चक्रव्यूहात न शिरतील असा प्रयत्न नशाबंदी मंडळाचा आहे.

तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ्यांच्या माध्यमातून आज मोठ्या प्रमाणात व्यसनांचे प्रमाण प्रत्येक समाज घटकांतील वयोगटापर्यंत पोहोचलेले आहे. त्यामुळे तंबाखूजन्य पदार्थ्यांच्या दुष्परिणामांबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती नशाबंद मंडळ करीत आहे. अमलीपदाथाचे वाढते आयाम व त्यांची सहज उपलब्धतेमुळे याचे प्रमुख बळी हे तरुण, शालेय विद्यार्थी बनत आहेत. त्यामुळे अमलीपदार्थांच्या संदर्भात ही मंडळ कार्यरत आहे. नवीन युगाचे नवीन व्यसन म्हणजे इंटरनेट आहे. हे व्यसन युवकांबरोबरच घरोघरी पोहोचलले असल्याने मोठ्या प्रमाणात अनेक युवक मनोरुग्ण होऊन मानसिक आजारांची त्रस्त आहेत. त्यामुळे नशाबंदी मंडळाचा आजचा उद्देश हा व्यसनाधीन व्यक्तींना व्यसनमुक्त करून व्यसनमुक्त समाजाचीनिर्मिती करणे आहे, असे मडामे यांनी सांगितले.

व्यसनांचे प्रकार व त्यांचे दुष्परिणाम आणि उपाय या संदर्भात माहिती देणारे पत्रक वाटप करणे, व्यसनमुक्तीवर पोस्टर्स प्रदर्शनी, व्यसनमुक्ती गीत, भजन, चित्रकला व पोस्टर्स स्पर्धा घेणे, शाळा, महाविद्यालय व धार्मिक परिसरात तंबाखू मुक्त कायद्याचे पलक लावणे, गणेशोत्सवात व्यसनविरोधी देखावा साकारणे, घोषवाक्य स्पर्धा, व्यसन घालवा, उत्सव वाचवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्यसनविरोधी पटनाट्य स्पर्धा, महात्मा फुले व्यसनमुक्ती युवा परिषद, आम्ही शिक्षण व्यसनमुक्तीचे प्रशिक्षण अभियान, २६ जून सामाजिक न्याय व अमलीपदार्थ सेवनविरोधी दिन साजरा करणे, व्हेलेंटाईन डे प्रेम करा खुल्लम करा, जोडीदार मात्र निर्व्यसनी निवडा, नववर्ष धुंदीत नव्हे शुद्धीत साजरे करा जागृती अभियान, व्यसनमुक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम, महात्मा गांधी व्यसनमुक्ती सप्ताह, ३ जानेवारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व १२ जानेवारी राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीनिमित्त व्यसनमुक्तीचा जागर कार्यक्रम, छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त काव्यस्पर्धा, व्यसनी व्यक्तींच्या कुटुंबाशी संवाद व समुपदेशन, पोलीस कृतज्ञता कार्यक्रम, मस्त बिनधास्त जगूया हे उपक्रम नशाबंदी मंडळातर्फे राबविण्यात येत आहे, असे वर्षा विद्या विलास यांनी सांगितले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!