3.5 C
New York
Wednesday, November 13, 2024

Buy now

कणकवली गणपती साना येथील लवकरच सुरूहोणार : सा.बां.चे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड

कणकवली | मयुर ठाकूर: गेल्या अनेक वर्षांच्या मागणीनंतर कणकवली शहर आणि जानवली या दोन गावांना जोडणाऱ्या जानवली नदी पात्रातील गणपती साना येथील मोठ्या पुलाची उभारणीचे काम बांधकाम विभागाने अवघ्या दोन महिने वीस दिवसात पूर्ण केले. जून महिन्यात या पुलावरून वाहतूक सुरू होणार आहे. दोन महिन्यापूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री तसेच सिंधुदुर्ग चे पालकमंत्री रवींद्र चव्हाण व आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत गणपती साना येथील पुलाचे भूमिपूजन झाले होते. आता हे पूल जून महिन्यात वाहतुकीस खुले होणार आहे. त्यामुळे कणकवली वासियांमधून समाधान व्यक्त होत आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विविध कामे मार्गी लागली. त्यातील एक काम म्हणजे कणकवली गणपती साना पूल! या पुलासाठी आमदार नितेश राणे यांनी विशेष पाठपुरावा केला होता. त्यामुळे सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांच्या मार्गदर्शनाखाली मार्च २०२४ मध्ये या पुलाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. जून महिन्यात पाऊस मोठा असतो, त्यामुळे हे काम जलद गतीने ठेकेदाराने देखील पूर्ण करण्याचा निश्चय केला असल्याचे प्रत्यक्षात दिसून येते. ८ कोटी ८ लाख रूपयांचा निधी मंजूर असलेल्या या पुलाचे काम अवघ्या दोन महिने वीस दिवसात पूर्ण केले. यासाठी ठेकेदाराने देखील विशेष मेहनत घेतली. याच जून महिन्यात हे पूल वाहतुकीस देखील खुले होणार असल्याचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत जेष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर यांनी या पुलामुळे कणकवलीतील बाजारपेठेला पुनर्जीवीतपणा येणार आहे. त्यामुळे समस्त कणकवली वासियांना या पुलाचा उपयोग होणार आहे. शेवटच्या टप्यात राहिलेले काम काही दिवसात पूर्ण होऊन वाहतुकीस हा पूल खुला होणार असल्याने नागरीकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!