22 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

खारेपाटण सरपंच प्राची इस्वलकर यांचा भाजपात प्रवेश

कणकवलीत आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत ओम गणेश निवासस्थानी केला पक्षप्रवेश

कणकवली | मयुर ठाकूर : खारेपाटण गावच्या सरपंच प्राची देवानंद इस्वलकर यांनी आज आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात जाहीर प्रवेश केला. प्राची इस्वलकर ह्या शिवसेना शिंदे गट पुरस्कृत खारेपाटण सरपंचपदी निवडून आल्या होत्या. खारेपाटण गावच्या विकासासाठी आमदार नितेश राणेंच्या माध्यमातून न्याय मिळू शकतो. ग्रामस्थांच्या प्रश्नांना न्याय देणे महत्वाचे आहे. आमदार नितेश राणे यांची कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून गाव विकासासाठी भाजपात प्रवेश केला असल्याचे सरपंच इस्वलकर यांनी सांगितले.

यावेळी माजी जि.प.सभापती बाळा जठार, माजी पं.स. सभापती दिलीप तळेकर, माजी पं.स. सदस्य तृप्ती माळवदे,  सूर्यकांत भालेकर, उपसरपंच महेंद्र गुरव, खारेपाटण माजी सरपंच रमाकांत राऊत, राजू वरुणकर, सुधीर कुबल, भाऊ राणे, अंजली कुबल, रफिक नाईक आदी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!