26 C
New York
Sunday, September 15, 2024

Buy now

४० वर्षाच्या सेवेची राणे साहेबांना मतदानातून जनतेने पोचपावती दिली ; आमदार नितेश राणे

दीपक केसरकर हे निवडणूकित मॅन ऑफ दि मॅच ठरले

उबाठा च्या अदृश्य हातांनी राणे साहेबांना केलेल्या मदतीबद्दल आभार

मनसेना अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी पदाधिकारी यांचे ही मानले आभार

पालकमंत्री कसा असावा याचे उत्तम उदाहरण नामदार रवींद्र चव्हाण यांच्यात दिसले

सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या मेहनतीतून यश

कणकवली | मयुर ठाकूर : महायुतीचे उमेदवार राणेसाहेब ४८ हजार मतांनी निवडून आले.आपल्या हक्काचा आणि विचारांचा खासदार रत्नागिरी सिंधुदुर्ग च्या जनतेने निवडून दिला.पहिल्या दिवसापासून आम्ही सांगत होतो की यावेळी इथला खासदार कमळ निशाणीचाच असेल. विनायक राऊत सारख्या निष्क्रिय खासदाराला घरी बसवून मोदींच्या विचारांचा खासदार निवडून देण्याचे जनतेने आधीच ठरवले होते. 40 वर्षे नारायण राणेंनी सिंधुदुर्गवासीयांची केलेली सेवेची पोचपावती कालच्या मतदानातून जिल्हावासीयांनी दिली आहे.असे प्रतिपादन भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी केले ते कणकवली प्रहार भवन येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
आमदार नितेश राणे म्हणाले,देशाचे पंतप्रधान मोदीजी, गृहमंत्री शहासाहेब, नड्डा साहेब, प्रदेशाध्यक्ष बावनकुळेजी , उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांचे आभार मानतो.पालकमंत्री कसा असावा याचे उत्तम उदाहरण नामदार रवींद्र चव्हाण यांनी दाखवून दिले. पालकमंत्री चव्हाण यांचे विशेष आभार मानतो.दीपक केसरकर हे कालच्या निवडणूकित मॅन ऑफ दि मॅच ठरले आहेत. त्यांनी महायुतीचा धर्म पाळतानाच प्रत्येक पत्रकार परिषदेत सिंधुदुर्ग विकासासाठी नारायण राणेंची गरज असल्याचे ते बोलत होते. केवळ बोलून न थांबता केसरकर यांनी प्रत्यक्ष कृतीतून मतदान वाढवून दिले. भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी मोलाचे सहकार्य केले. राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक व त्यांच्या सहकाऱ्यांनी खूप काम केले.पुढच्या काळात महायुती म्हणून एकजूट ठेवणे आवश्यक आहे. काही कटू अनुभव यावेळी आले.त्याबद्दल महायुती च्या व्यासपीठावर बोलेन.काहींचा हिशोब चुकता करायचा आहे. तो सव्याज करणार. उबाठा च्या अदृश्य हातांनी राणे साहेबांना केलेल्या मदतीबद्दल आभार मानतो.विनायक राऊत यांनी जिल्ह्यात शिवसेना संपवण्याचे काम केले. त्याचा वचपा उबाठा च्या अदृश्य हातानी केले, त्यांचे आभार मानतो.

कणकवली विधानसभा मतदारसंघात प्रथम क्रमांकाचे 42 हजार मतांचे लीड मतदारांनी दिले. त्याबद्दल कणकवली विधानसभेतील जनतेचे आभार मानतो.जेव्हा जेव्हा उद्धव ठाकरेंनी कणकवलीत येऊन राणे कुटुंबाला शिव्या घातल्या की त्याचा वचपा जनता काढेल.विधानसभेला मला 30 हजारांचे लीड होते ते आता 42 हजारांचे झाले आहे. येत्या विधानसभेला माझे मतदार आणखी ताकदीने माझ्या पाठीशी राहतील. म्हणून विरोधकांनी मला कितीही नावे ठेवली तरी जनता माझ्या पाठीशी आहे. त्यामुळे कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघातील जनतेचे मी मनापासून आभार मानतो असे आमदार नितेश राणे म्हणाले. कुडाळला मध्ये भाजपने घेतलेली लीड पाहता येत्या विधानसभेत भाजप चां उमेदवार निवडून येणार असल्याचे आमदार नितेश राणे यांनी सांगितले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!