13 C
New York
Sunday, October 13, 2024

Buy now

माझ्या विजयातून जनतेने दिले विरोधकांना चोख उत्तर

नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांची प्रतिक्रिया

रत्नागिरी : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील जनतेने मला खासदार म्हणून निवडून दिले आहे. या लोकसभा मतदारसंघातील सर्वांगीण विकासासाठी काम करत राहणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील रखडलेला मुंबई गोवा महामार्ग, इथला पाण्याचा प्रश्न, विमानतळाचा प्रश्न मार्गी लावला जाईल. भाजपाच्या विरोधकांना ही निवडणूक आत्मपरीक्षण करायला लावणारी आहे.

ठाकरे गटाच्या ज्या खासदाराने गेल्या दहा वर्षात एकही काम केलं नाही, त्या खासदाराला जनतेने जागा दाखवत घरी बसवले आहे. भाजपच्या विरोधकांनी माझा पराभव होणार, तसेच टीका करत विरोधी नेत्यांनी अपप्रचार केला. त्यांनाही माझ्या कोकणातील जनतेने चोख उत्तर या निकालातून दिल्याची प्रतिक्रिया नवनिर्वाचित रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांनी दिली. लोकसभा निवडणुकीत विजयानंतर ते रत्नागिरी येथे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी माजी आमदार बाळा माने, भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. सावंत संदीप कुडाळकर यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!