29.7 C
New York
Tuesday, June 18, 2024

Buy now

रत्नागिरीतील कंपनीकडून सिंधुदुर्गातील १३३ जणांना सव्वादोन कोटींना चुना

कुडाळ : रत्नागिरी येथील आर्जू टेक्सोल प्रा. लि. या कंपनीच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती सिंधुदुर्गात वाऱ्यासारखी पसरताच सिंधुदुर्गातील शाखेमध्ये पैसे भरणा केलेल्या काही जणांनी आज कुडाळ पोलिस ठाण्यात धाव घेतली. जवळपास २ कोटी २५ लाख रुपयांची रक्कम या १३३ जणांची असल्याचे सांगितले जात आहे. ही रक्कम अजूनही वाढण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात सदरची कंपनी असून, जॉब वर्कर्सच्या नावाने या कंपनीने सिंधुदुर्गातही आपली शाखा उघडली होती. विशेष म्हणजे कुडाळ पोलिस स्थानकापासून हाकेच्या अंतरावर ही शाखा कार्यरत होती. रत्नागिरीत या कंपनीकडून गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याची माहिती सिंधुदुर्गात वाऱ्यासारखी पसरताच सिंधुदुर्गातील गुंतवणूकदारांनी कुडाळ पोलिस ठाणे आवारात गर्दी केली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!