28.9 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

दोडामार्गसाठी नवीन उपकेंद्र उभारा गणेशप्रसाद गवस

दोडामार्ग : तालुक्यातील सततच्या ‘ बत्ती गुल ‘ वर कायमस्वरूपी उपाय योजण्यासाठी दोडामार्ग ते साटेली भेडशी दरम्यान एक नविन उपकेंद्र विद्युत वितरण कंपनीने प्रस्तावित केले आहे. त्यासाठी शासनाने एक एकर जमीन उपलव्ध करावी व सादर केलेल्या प्रस्तावासाठी आर्थिक तरतुद करावी अशी मागणी शिवसेनेचे (शिंदे गट ) तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांनी केली आहे.त्यासंदर्भात त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली आहे.

पत्रात म्हटले आहे,दोडामार्ग तालुका मागे चार दिवस अंधारात होता. अनेक गावात आठ दहा दिवस लाईट नाहीय.पावसाळयापुर्वी दरवर्षी हे प्रकार होत असतात. गेल्या पंधरा दिवसात वारंवार लाईट जाणे व एक दोन दिवस न येणे असे प्रकार होतच आहेत. यासाठी कायमस्वरूपी उपाय योजना करणे आवश्यक आहे.त्यासाठी त्यांनी काही मागण्या केल्या आहेत. त्या अशा :
तालुक्यात विद्युत मंडळ कार्यालयात अपुरा कर्मचारी वर्ग व तांत्रिक कर्मचारी कमी असल्याने त्यांची लवकर भरती करावी.
महालक्ष्मी विद्युतचा करार संपलेला आहे विद्युत वितरण,महालक्ष्मी कंपनी आणि सरकार यांच्यात करार करावा आणि करारात सातत्य ठेवावे आणि महालक्ष्मीचा वीज पुरवठा संपूर्ण तालुक्याला करावा.
दोडामार्ग शहर ते साटेली भेडशी दरम्यान एक नविन उपकेंद्र विद्युत वितरण कंपनीने प्रस्तावित केले आहे. त्यासाठी शासनाने एक एकर जमीन उपलव्ध करावी व सादर केलेल्या प्रस्तावासाठी आर्थिक तरतुद करावी.
इन्सुली उपकेंद्र ते सासोली उपकेंद्र या दरम्यान असलेली ३३ के. व्ही. लाईन पूर्ण कोटेड करून मिळावी यासाठी पण प्रस्ताव सादर केलेला आहे. त्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात यावी.तसेंच इन्सुली सासोली दरम्यान भूमिगत वीज वाहिनी घालावी.यासाठी आपण आपल्या स्तरावरून प्रयत्न व पाठपुरावा करावा आणि तालुकावासीयांची गैरसोय दूर करावी असेही श्री. गवस यांनी पत्रात म्हटले आहे.

महावितरणचे अधिकारी बुधवारी दोडामार्गात

महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री. तनपुरे व श्री. वाघमोडे बुधवारी 5 जूनला दुपारी तीन वाजता दोडामार्गला भेट देऊन तेथील समस्या जाणून घेणार आहेत तसेच त्या तत्काळ सोडविण्याचे प्रयत्न करतील.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!