13 C
New York
Sunday, October 13, 2024

Buy now

इन्सुली पोलीस चेकपोस्टवर बेकायदा दारू वाहतुकीवर कारवाई

१९ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त ; गुजरात येथील एक ताब्यात

बांदा : मुंबई – गोवा महामार्गावर इन्सुली पोलीस चेकपोस्टवर बांदा पोलिसांनी बेकायदा दारू वाहतुकीवर कारवाई केली. यात ७ लाख २० हजार रुपयांच्या गोवा बनावटीच्या दारुसह एकूण १९ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बेकायदा दारू वाहतूक प्रकरणी इक्बाल जुमाभाई थेबा (२६, रा. जुनागड सिटी, गुजरात) याला ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई बुधवारी पहाटे २ वाजण्याच्या सुमाराला करण्यात आली.

या कारवाईत १२ लाखांचा ट्रक (जीजे ०१ डीवाय ५५९४) ताब्यात घेण्यात आला. तसेच ७ लाख २० हजार रुपयांची मोबी व्होडका ऑरेंज असे लेबल असलेल्या दारूचे २०० बॉक्स जप्त करण्यात आले. तसेच ५ हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण १९ लाख २५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरची कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास बडवे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल प्रथमेश पोवार व रोहित कांबळे यांनी केली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!