23.8 C
New York
Saturday, July 12, 2025

Buy now

दहावीच्या निकालात कोकणची बाजी | कोकण विभागाचा ९९.१% ; तर राज्याचा निकाल ९५.८१ टक्के

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नुकतीच इयत्ता दहावीच्या निकालाची एकूण टक्केवारी जाहीर केली आहे. यंदा दहावीचा एकूण निकाल ९५.८१ टक्के लागला आहे. सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा ९९.१% असा लागला आहे, तर सर्वात कमी निकाल हा नागपूर विभागाचा लागला आहे.

राज्य शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत दहावीची परीक्षा १ ते २६ मार्च या कालावधीमध्ये घेण्यात आली होती. दहावीच्या निकालात यंदा ही मुलींनी बाजी मारली आहे. विभागनिहाय निकालाची एकूण टक्केवारी मंडळामार्फत नुकतीच जाहीर करण्यात आली. दरम्यान, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीचा निकाल आज दुपारी १ वाजता बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे.

ऑनलाईन निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळे :

https://mahresult.nic.in
http://sscresult.mkcl.org https://sscresult.mahahsscboard.in https://results.digilocker.gov.in यंदा दहावीच्या परीक्षेसाठी २३ हजार २७२ शाळांमधून १६ लाख ९ हजार ४४५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यामध्ये एकूण ८ लाख ५९ हजार ४७८ विद्यार्थी, ७ लाख ४९ हजार ९११ विद्यार्थिनी आणि ५६ तृतीयपंथी आहेत. राज्यातील एकूण ५ हजार ८६ मुख्य केंद्रांवर ही दहावीची परीक्षा पार पडली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!