13.9 C
New York
Sunday, October 13, 2024

Buy now

….अन्यथाचार दिवसांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढणार | नांदगाव ग्रामस्थांचा त्या प्रकणावरून इशारा

पोलीस निरीक्षक समशेर तडवी यांना त्या प्रकरणाबाबत विचारला जाब

कणकवली : तालुक्यातील नांदगाव परिसरातील एका युवतीने १५ मे रोजी विनयभंग झाल्याची तक्रार दाखल केल्यानंतर या संदर्भात गुन्हा दाखल असलेल्या संशयित आरोपी मुराद हमीद साटविलकर (रा. नांदगाव) याला अद्याप अटक करण्यात आली नाही. त्यामुळे नांदगाव पंचक्रोशीतील नागरिक संतप्त झाले होते. संतप्त झालेल्या नांदगाव पंचक्रोशीतील सरपंच व ग्रामस्थांनी कणकवली पोलीस ठाण्यावर धडक देत पोलीस निरीक्षक समशेर तडवी यांना जाब विचारला.

संशयित युवक कुटुंबीयांना धमकी देत असून या पीडित युवतीवर जर जीवघेणा हल्ला झाला तर त्याला जबाबदार कोण ? संशयित आरोपी ला गुन्हा दाखल झाल्यानंतर काय पायबंद केला ? विनयभंग झाल्यावर आरोपीला अटक करता मात्र याच प्रकरणात असे नेमके काय झाले ? असे एक ना अनेक प्रश्न या दरम्यान उपस्थित करण्यात आले.

यासंदर्भात तक्रार दाखल करून घेतली असून गुन्हा दाखल आहे. अजून काही यासंदर्भातील तक्रार असली तर ती देखील दाखल करून चौकशी करून कारवाई करू, असे आश्वासन पोलीस निरीक्षक समशेर तडवी यांनी दिले. मात्र कायदेशीर बाबी पडताळून अटकेची कारवाई केली जाईल असेही त्यांनी सांगितले.

याबाबत पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या तक्रार अर्जात असे म्हटले आहे की, सदर संशयित आरोपी असलेल्या युवकाने पीडीत युवतीला विवाह करायचा तगादा लावला होता. त्या युवतीने होणाऱ्या त्रासाला कंटाळून कणकवली पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली. त्यानुसार संशयित आरोपीविरुद्ध भा.द.वी कलम ३५४, ३५४ ड, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मात्र या घटनेला जवळपास पंधरा दिवस होत आले तरी अद्यापही कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नाही. तसेच यापूर्वी ही असे बरेच प्रकार घडले आहेत. त्यावर देखील कठोर कारवाई झालेली नाही. हा प्रकार घडलेल्या कुटुंबातील एकमेव कमावती व्यक्ती सदर युवती असल्याने तिचे कुटुंबीय भीतीच्या दडपणाखाली आहेत. भविष्यात पुन्हा याच मुलीवर हल्ला झाला तर याला जबाबदार कोण ? असा प्रश्न उपस्थित केला आहे. संशयित आरोपी सातत्याने धमकी देत असून पोलीस काय करतायत असा सवालही ग्रामस्थांनी केला. कठोर कारवाई होत नसल्यानेच असे प्रकार वारंवार घडल आहेत. तेव्हा हे प्रकार त्वरित थांबविण्यासाठी योग्य ती कारवाई झालीच पाहिजे अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली. येणाऱ्या चार दिवसांत संबंधितावर कारवाई झाली नाही तर पंचक्रोशीतील ग्रामस्थ पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढतील, असा देखील इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला आहे.

याप्रसंगी नांदगाव सरपंच रविराज उर्फ भाई मोरजकर, असलदे सरपंच चंद्रकांत डांमरे, असलदे माजी सरपंच पंढरी वायंगणकर, सोसायटी चेअरमन भगवान लोके, माजी सभापती दिलीप तळेकर, श्री. सदडेकर यांच्यासह ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या. सदरचा प्रकार लव्हजिहाद सारख्या प्रकारातील आहे का ? याची देखील कसून पडताळणी कारवाई अशी चौकशीची मागणी यावेळी करण्यात आली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!