29.7 C
New York
Tuesday, June 18, 2024

Buy now

आंबे खाण्याच्या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

युवा संदेश प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले होते आयोजन

कणकवली | मयुर ठाकूर : दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील युवा संदेश प्रतिष्ठानच्यावतीने “एक दिवस छोट्या दोस्तांचा” हा धमाल मस्तीचा अभिनव उपक्रम रविवारी २६ मे रोजी कनेडी बाजारपेठ, सांगवे येथे सकाळी ९ ते १२.३० या वेळेत घेण्यात आला. जिल्हा परिषद मतदार संघ नाटळ व हरकुळ मर्यादीत या स्पर्धेत २७९ विद्यार्थी सहभागी झाले होते.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे : पहिला गट –

अंगणवाडी ते इयत्ता ३री –
प्रथम क्रमांक – हार्दिक सावंत ९
( भिरवंडे नं १ ), द्वितीय क्रमांक – प्रथमेश देसाई ( कनेडी बाजार पेठ ), तृतीय क्रमांक – पराग गुरव ( दारिस्ते ).

दुसरा गट :
इयत्ता ४ थी ते ७ वी –
प्रथम क्रमांक – लक्ष्मण हर्णे ( कनेडी हायस्कूल ), द्वितीय क्रमांक – विघ्नेश म्हापणकर ( सांगवे ), तृतीय क्रमांक – श्रेयस दारिस्तेकर ( दारिस्ते ).

स्पर्धेत विजेत्या लहान गटातील मुलांना अनुक्रमे १५००, १०००, ७०० तर, मोठा गट अनुक्रमे २५००, २०००, १५०० रुपये व शैक्षणिक साहित्य बक्षीस म्हणून देण्यात आले.

यावेळी गणपत सावंत ( कनेडी गटशिक्षण मंडळ खजिनदार तथा निवृत्त शिक्षक भिरवंडे ) यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी युवा संदेश प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संदेश ऊर्फ गोट्या सावंत, संजना सावंत, सुरेश सावंत, सुरेश ढवळ, विजय भोगटे, अशोक कांबळे, मंगेश बोभाटे, चंद्रसेन कांबळे, नितीन गावकर,मकरंद सावंत, राजेश सापळे, प्रफुल्ल काणेकर, महेश खांदारे, मिलिंद गावकर, धोंडी वाळके, संतोष विचारे, रमेश सापळे, मयुरी मुंज, राजश्री पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

जादूचे प्रयोग व मनोरंजक खेळ

या कार्यक्रमात जादूगर वैभवने रंगत आणली. सर्व मुलांनी जादुचे खेळ व मनोरंजक खेळांचा आनंद घेतला. या कार्यक्रमासाठी परीसरातील शिक्षक, विद्यार्थी, पालक बहुसंख्येने उपस्थित होते. या नाविन्यपूर्ण उपक्रमाची उपस्थितांनी वाहवा केली. समारोप प्रसंगी बोलताना संदेश सावंत यांनी उपस्थितांचे आभार मानले.

युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च STS परीक्षेतील १५ गुणवंत विद्यार्थ्यांना विमानाने इस्रो सफर घडविण्यात येणार असल्याचे जाहिर केले. १८ जून ते २१ जून २०२४ या कालावधीत १५ गुणवंत विद्यार्थी विमानाने त्रिवेंद्रम येथे इस्रो भेटीसाठी जाणार आहेत. याचा सर्व खर्च युवा संदेश प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष संदेश ऊर्फ गोट्या सावंत आणि संजना संदेश सावंत करणार असल्याचे जाहीर केले. तसेच उपस्थित सर्व मुलांना मोफत लकी ड्रॉ कुपन देण्यात आली होती. पहिल्या १० विजेत्यांना आकर्षक शैक्षणिक साहित्य बक्षिस म्हणून देण्यात आले. तसेच युवा संदेश प्रतिष्ठानच्यावतीने मराठी भाषा दिनाच्या औचित्याने आयोजित स्पर्धांचा बक्षिस वितरण समारंभ यावेळी करण्यात आला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!