26.4 C
New York
Saturday, September 14, 2024

Buy now

असलदेत सोसायटी खत विक्रीचा शुभारंभ

सोसायटी माजी चेअरमन अंकुश परब , संचालक अनंत तांबे यांना वाहण्यात आली श्रध्दांजली

अंकुश डामरे यांच्या सामाजिक कार्याचा आदर्श ठेवून सुरू आहे काम – चेअरमन भगवान लोके

कणकवली | मयुर ठाकूर : असलदे सोसायटीचे माजी चेअरमन अंकुश डामरे यांनी लावलेल्या संस्थारुपी रोपट्याचे आता वटवृक्षात रुपांतर होत आहे. त्यांनी या संस्थेसाठी आणि गावासाठी दिलेले योगदान आम्ही कदापी विसरु शकणार नाही. त्यांनी चेअरमन व विविध पदांवर कार्यरत असताना गावाच्या प्रगतीसाठी प्रामाणिक प्रयत्न केले . अंकुश डामरे यांच्या सामाजिक कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पुढील काळात आमची वाटचाल असेल , असा विश्वास सोसायटी चेअरमन भगवान लोके यांनी व्यक्त केला.

असलदे रामेश्वर विविध कार्यकारी सहकारी सोसायटी मासिक सभा चेअरमन भगवान लोके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी असलदे सोसायटी व ग्रामस्थांच्यावतीने असलदे सोसायटीचे माजी चेअरमन , माजी सरपंच , नांदगांव पंचक्रोशीत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अंकुश डामरे यांचे नुकतेच निधन झाल्याने शोक व्यक्त करण्यात आला. तसेच सोसायटी संचालक अनंत तांबे यांचे निधन झाले. त्याबद्दल सोसायटी संचालक व ग्रामस्थांच्या उपस्थितीत श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी सोसायटी त्यानंतर खरीप हंगामासाठी खत विक्री शुभारंभ सरपंच चंद्रकांत डामरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी गावातील शेतक-यांना सेंद्रिय खते , सुफला , कृषीउद्योग यासह विविध प्रकारची खते विक्री करण्यात आली.

या सोसायटीच्या बैठकीत आगामी काळात शेती कर्ज , दिर्घ मुदत , अल्प मुदत व अन्य कर्ज वसुली करण्याबाबत चर्चा झाली. 25 जुन पुर्वी सर्व कर्जदारांकडून कर्ज वसुली व त्या कर्जदारांना नव्याने कर्ज उचल देण्याचे नियोजन करण्यात आले. सिंधुदुर्ग बॅंकेच्या धोरणानुसार नव्याने कर्ज उचल शेतक-यांना देत असताना सातबारा व आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पडताळणी करण्याचे ठरवण्यात आले. तसेच संस्थेच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या दृष्टीने विविध मुद्दांवर चर्चा झाली.

यावेळी व्हाईस चेअरमन दयानंद हडकर , उपसरपंच सचिन परब , माजी चेअरमन प्रकाश परब , सोसायटी संचालक शत्रुघ्न डामरे , परशुराम परब , शामराव परब , विठ्ठल खरात , माजी तंटामुक्त अध्यक्ष बाबाजी शिंदे , विनायक परब , दिनेश शिंदे , प्रविण डगरे , उत्तम नरे , रघुनाथ लोके , भालचंद्र लोके , मधुसुदन परब , सचिन हरमलकर , मनोज लोके , प्रविण डामरे , संतोष घाडी , तुषार घाडी , विजय डामरे , अनिल लोके, प्रकाश डामरे , गणेश डामरे , एकनाथ डामरे , सत्यवान लोके , संतोष डामरे , रामचंद्र डामरे , सदाशिव डामरे , भास्कर मालवणकर , प्रशांत लोके , वासुदेव दळवी , विजय परब , गुरुनाथ हडकर , भरत डामरे , जयवंत लोके , बाबू वाळके , सत्यवान घाडी,सोसायटी सचिव अजय गोसावी,लिपिक गौरी लोके आदींसह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

असलदे सोसायटीच्यावतीने खत विक्रीचा शुभारंभ करताना असलदे सोसायटी चेअरमन भगवान लोके सोबत सरपंच चंद्रकांत डामरे , व्हाईस चेअरमन दयानंद हडकर , उपसरपंच सचिन परब , सोसायटी संचालक शत्रुघ्न डामरे , परशुराम परब, शामराव परब , विठ्ठल खरात आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!