22 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

टोपीवालाची स्नेहलता तेली सिंधुदुर्गात तृतीय

मालवण तालुक्याचा निकाल ९९.२० टक्के ; समृद्धी शेट्ये द्वितीय तर मानसी करलकर तृतीय

मालवण : फेब्रुवारी २४ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा तालुक्याचा निकाल ९९.२० टक्के लागला आहे. परीक्षेसाठी तालुक्यातून ८७९ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी ८७२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये १५४ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीत, ३२१ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, ३५ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. तालुक्यात टोपीवाला हायस्कूलच्या वाणिज्य शाखेची स्नेहलता सत्यविजय तेली (५६९) गुण मिळवून प्रथम आली आहे. याच शाखेची समृध्दी परशुराम शेटये (५६८) गुण मिळवून द्वितीय तर कला शाखेची मानसी निलेश करलकर (५५५) गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहे. स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, बराडकर हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज कट्टा, इ. द. वर्दम कला वाणिज्य कला कनिष्ठ महाविद्यालय, बराड आर्टस कॉमर्स ज्युनियर कॉलेज वराड, जयश्री वामन प्रभु आर्ट अॅन्ड कॉलेज, वराडकर इंग्लिश मिडीयम स्कूल या महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. महाविद्यालयनिहाय निकाल असा- टोपीवाला ज्युनियर कॉलेजचा निकाल ९९.२६ टक्के लागला आहे.

महाविद्यालयातून २७३ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी २७१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कला शाखा प्रथम- मानसी निलेश करलकर (५५५), द्वितीय- स्वप्नील शिवाजी कांदळगावकर (५०९), तृतीय- अनुष्का अमोल परब (४९१), वाणिज्य शाखा- प्रथम- स्नेहलता सत्यविजय तेली (५६९), द्वितीय – समृध्दी परशुराम शेटये (५६८), तृतीय- कामाक्षी दिलीप काळसेकर (५५१), विज्ञान शाखा- प्रथम- निनाद प्रसाद आरोंदेकर (४९३), द्वितीय- रुद्र संदिप शिरोडकर (४८१), तृतीय- मैथीली लक्ष्मीकांत हडकर (४७३) यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष शरद परुळेकर, सचिव विजय कामत, कार्याध्यक्ष दत्तप्रसाद खानोलकर, मुख्याध्यापक लक्ष्मण वळंजू यांनी अभिनंदन केले. भंडारी ज्युनियर कॉलेजचा निकाल ९९.२४ टक्के लागला आहे. परीक्षेसाठी १३३ विद्यार्थी प्रविष्ठ झाली होती. त्यापैकी १३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कला शाखा- प्रथम- भाग्यश्री निलेश लाड (३९५), द्वितीय- साक्षी ज्ञानेश्वर सादये (३८४), तृतीय- साक्षी नयनकुमार कुडाळकर (३६८), वाणिज्य- प्रथम- श्रावणी विनोद साळकर (५३५), द्वितीय- ईशा सत्यवान चव्हाण (५१२), तृतीय- प्रीती पंडित सावंत (५०७), विज्ञान- प्रथम- कामिनी विजय डगला (३७७), द्वितीय- दिप्ती प्रशांत कुबल (३७६), जयश्री नारायण परब (३७५) सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे ज्युनिअर कॉलेजचे मुख्याध्यापक हणमंत तिवले, संस्थेचे अध्यक्ष विजय पाटकर, चेअरमन सुधीर हेरेकर, ऑनररी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर व संस्था पदाधिकारी तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे. यात परीक्षेस एकूण ६१ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ झाले होते. कला शाखेमधून २६ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ झाले व निकाल १०० टक्के लागला आहे. यामध्ये प्रथम- क्षितिजा बयाजी खरवते (८३.५० टक्के), द्वितीय- वैदेही मंगेश ठाकूर (७२.१७ टक्के) व आदेश अविनाश हाक्के (७२.१७ टक्के) आणि तृतीय- संदीप सुहास गावकर (६९.३३ टक्के) यांनी पटकावला आहे तर वाणिज्य शाखेमधून ३५ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ झाले व निकाल १०० टक्के लागला. यामध्ये प्रथम- यज्ञा शरद पडवळ (७५.३३ टक्के), द्वितीय- पूजा व्यंकटेश टक्के (७३.३३ टक्के) तर तृतीय- रिया रविंद्र केळुसकर (६८.५० टक्के) यांनी पटकावला आहे.

यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे कृ.सि.देसाई शिक्षण मंडळ कार्याध्यक्ष बाळासाहेब पंतवालावलकर, संस्थेचे सचिव चंद्रशेखर कुशे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर, कनिष्ठ महाविद्यालय समन्वयक प्रा. हसन खान, प्रा. स्नेहा बर्वे, प्रा. अन्वेषा कदम, प्रा. हर्षदा धामापूरकर, प्रा. मिनल सामंत आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे. सौ. इंदिराबाई दत्तात्रय वर्दम हायस्कूल व कला वाणिज्य (संयुक्त) कनिष्ठ महाविद्यालय पोईप विरण या प्रशालेचा उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला आहे. कनिष्ठ महाविद्यालयातून २७ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते सर्वच्या सर्व २७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कला शाखेमध्ये एकुण ५ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते ते सर्वच्या सर्व उत्तीर्ण होत प्रथम- प्रतीक पुरुषोत्तम कासले (४४२), द्वितीय- दिपाशा अर्जुन पवार (३१६), तृतीय- शुभम लक्ष्मण शिंदे (२६२) वाणिज्य शाखेमध्ये २२ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते ते सर्वच्या सर्व उत्तीर्ण होत प्रथम- दिशा विलास परब हिला (५३३), द्वितीय- साक्षी सुभाष मेस्त्री (४८७) तृतीय- महादेव संदिप पारकर यांला (४८२) या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष अनिल कांदळकर, सचिव विलास माधव, उपाध्यक्ष गोपीनाथ पालव, सर्व विद्यमान संचालक, मुख्याध्यापक श्री. कुंभार, सर्व प्राध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, पंचक्रोशीतील सर्व पालक यांनी अभिनंदन केले आहे. वराडकर हायस्कूल कट्टाचा निकाल १०० टक्के लागला आहे. वाणिज्य- विशाखा सुनिल रावले (५१४), प्रतिक्षा निलकंठ मेस्त्री (५०९), राजकुमार आनंद दुखंडे (५०४), कला- रुपाली प्रविण वायंगणकर (४२६), निकिता देउ झोरे (४२५), काव्या सुहास मसुरकर (४०५), एकूण ११४ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. सर्व विद्यार्थ्यांचे कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त कर्नल शिवानंद वराडकर, अॅड एस. एस. पवार, अध्यक्ष अजयराज वराडकर, उपाध्यक्ष आनंद वराडकर, शेखर पेणकर, सचिव सुनिल नाईक, विजयश्री देसाई, सहसचिव साबाजी गावडे, खजिनदार रविंद्रनाथ पावसकर, अन्य संचालक, शालेय समिती अध्यक्ष सुधीर वराडकर, मुख्याध्यापक संजय नाईक, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. धी आचरा पीपल्स असोसिएशन संचलित न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आचराचा बारावीच्या निकालात आपल्या उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली.

कला विभागात प्रविष्ट ४३ विद्यार्थ्यांपैकी ४२ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ९७.६७टक्के निकाल लागला तर वाणिज्य विभागात प्रविष्ट ९२ पैकी ९१ विद्यार्थी पास होउन प्रशालेचा निकाल ९८.९१ टक्के लागला. कला विभाग- प्रथम- मिस्बा तैय्यब काझी (५३९), द्वितीय- सानिया दत्तात्रय मळगी (५२४) तृतीय- विशाल परशुराम धुरी (४८१), वाणिज्य विभाग- प्रथम- संजना शरद पवार (५२९), द्वितीय- निर्झरा संदेश मालडकर (५२४), तृतीय- अल्फीजा साजिद मुजावर (५१५) गुण मिळविले. यशस्वी विद्यार्थ्यांचे धी आचरा पीपल्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रदिप मिराशी, कार्याध्यक्ष प्रदिप परब मिराशी, सचिव अशोक पाडावे तसेच स्थानिक स्कूल कमिटी चेअरमन निलीमा सावंत, सदस्य राजन पांगे, अर्जुन बापर्डेकर, बाबाजी मिसळे, रघुनाथ पाटील, मुख्याध्यापक गोपाळ परब, उपमुख्याध्यापक अंकुशराव घुटूकडे यांसह सर्व शिक्षक पालक वर्गातून अभिनंदन करण्यात येत आहे. मसुरे येथील आर. पी. बागवे हायस्कूल आणि एम. जी. बागवे भरतगड. उच्च माध्यमिक व्यवसाय शिक्षण तांत्रिक विद्यालयाचा बारावीचा निकाल ९२.५९ टक्के लागला आहे. तीन ट्रेड मधून प्रविष्ठ २७ विद्यार्थ्यांपैकी २५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रथम- सागर अमोल धावडे (८० टक्के), व्दितीय- केदार कमलाकर तांडेल. (७८ टक्के), तृतीय- हर्षद दत्ताराम सांडव (७६.५० टक्के) यांनी यश प्राप्त केले. यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्था व प्रशालेच्या वतीने संस्था अध्यक्ष डॉ. दीपक परब यांनी अभिनंदन केले आहे. स्व. सौ. जयश्री वामन प्रभु कला व वाणिज्य महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे. कला- प्रथम- छाया उदय चव्हाण (३९५), यश चंद्रकांत खोत (३८३), वल्लभ जगदिश जोशी (३७०), वाणिज्य- प्रथम- अक्षता कृष्णा नेमळेकर (५२४), शिवानी सतीश ठाकूर (५१८), साक्षी संदिप गुराम (५०४) सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अध्यक्ष हेमंत परब व इतर कार्यकारीणी पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. वराडकर इंग्लिश मिडीयम स्कूल कट्टाचा निकाल १०० टक्के लागला आहे. यात प्रथम- रिया रमाकांत गोसावी (५४०), द्वितीय- आनंदी सदानंद परब (५१२), तृतीय- दीक्षा विश्वनाथ कदम (५०४) गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!