28.4 C
New York
Tuesday, June 18, 2024

Buy now

बारावी परीक्षेत कणकवली तालुक्‍यात परेश मडव प्रथम

चिन्मय शेळके द्वितीय तर विज्ञानी प्रभू तृतीय; तालुक्‍याचा निकाल ९८.१७ टक्‍के

कणकवली : बारावी परीक्षेत कणकवली तालुक्‍याचा निकाल ९८.१७ टक्‍के एवढा लागला आहे. यात कणकवली कॉलेज मधील परेश मडव (सायन्स) याने ९४.८३ टक्‍के गुण मिळवून तालुक्‍यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. कणकवली काॅलेजजाच चिन्मय दिलीप शेळके (कॉमर्स) याने ९२.६७ टक्‍के गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर कनेडी हायस्कूलची विज्ञानी प्रभू (सायन्स) हिने ९२. ३३ टक्‍के गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.

बारावी परीक्षेसाठी तालुक्‍यात २०३१ जणांनी नोंदणी केली. त्‍यातील प्रत्‍यक्ष २०२५ विद्यार्थी परीक्षेला बसले. तर १९८८ जण उत्तीर्ण झाले. यात विशेष प्राविण्य श्रेणीत २३०, प्रथम श्रेणीत ९५८, द्वितीय श्रेणीत ७११ अाणि पास श्रेणीत ८९ जण आहेत.

तालुक्‍यातील कनिष्‍ठ महाविद्यालयांच्या निकालामध्ये एस एम ज्युनिअर कॉलेज कणकवलीमध्ये संचाली जयवंत डगरे ही तीनही विभागामध्ये सर्व विद्यार्थ्यांत प्रथम आली आहे. विज्ञान शाखेत झेविअर अॅग्नेल फर्नांडीस हा ७३.५० टक्के मिळवून व्दितीय आला आहे. तर विज्ञान शाखेत अमेय अनिल मालप आणि आयुष शंकर दळवी यांनी प्रत्‍येकी ७०.५० टक्‍के गुण मिळविले. वाणिज्य विभागात प्रतिक प्रशांत राणे याने ७२.६७ टक्के तर सौरभ सुनिल तारी याने ७१.५० टक्के प्राप्त केले. कणकवली कॉलेज कणकवली मध्ये विज्ञान शाखेमध्ये परेश सतीश मडव याने ९४.८३ टक्‍के, निलम नामदेव गुरव हिने ९२ टक्‍के, कनिज फातिमा अन्सारी हिने ८९.१७ टक्‍के तर सुजल राजेंद्र मुंज हिने ८९.१७ टक्‍के गुण मिळविले. वाणिज्य शाखेमध्ये चिन्मय दिलीप शेळके याने ९२.६७ टक्‍के, प्राची संभाजी घाडीगांवकर ९० टक्‍के, सिध्देश लवू पालव ९० टक्‍के, हर्ष नरसिंह पटेल याने ८७.१७ टक्‍के गुण मिळविले. कला शाखेमध्ये : साक्षी संतोष गांवकर ७९.६७ टक्‍के, सृष्टी अतुल शेटये ७६.६७ टक्‍के, वेदांत भालचंद्र नरसाळे ७१ टक्‍के गुण मिळविले. ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स कनेडी मध्ये विज्ञान शाखेत विज्ञानी राजेश प्रभू ९२.३३ टक्‍के, कल्याणी दिलीप भोये ८८.५० टक्‍के. स्वरा रमण बाणे ८५ टक्‍के. वाणिज्य शाखेत साक्षी सत्यवान गावकर ८९.१७ टक्‍के, यश संजय आचरेकर ८७.१७ टक्‍के, रिया रमाकांत सदडेकर ८६.८३ टक्‍के, कला शाखेत निशिगंधा सुभाष कुबल ७४.५० टक्‍के, मानसी सूर्यकांत गावकर ७३.५० टक्‍के, तेजस चंद्रकांत चव्हाण ७३.१७ टक्‍के गुण पटकावले. आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे ज्युनिअर कॉलेजमध्ये विज्ञान शाखेत शुभम तिवरेकर ८९ टक्‍के, आर्या मांजरेकर ८७.६७ टक्‍के, साईराज तावडे ८२.५० टक्‍के, सलोनी मुळीक ८१.६७ टक्‍के, हर्षाली सादये ८०.५० टक्‍के तर वाणिज्‍य शाखेत मंदिरा काणेकर ७१.८३ टक्‍के, जिनान शेख याने ७० टक्‍के आणि साहिल शेख याने ६९.८३ टक्‍के गुण मिळविले आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!