30.1 C
New York
Tuesday, June 18, 2024

Buy now

अर्टिका व व्हेगेनर कार मध्ये अपघात | दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान

देवगड : देवगड कट्टा येथे मंगळवारी ७ वाजण्याच्या सुमारास कट्टा येथील धोकादायक वळणावर अर्टिका व व्हेगेनर कार यामधे अपघात झाला असून या अपघातात दोन्ही गड्याचे मोठे नुकसान झाले आहे.

उपलब्ध माहितीनुसार मुंबई येथील समीर रघुनाथ जाधव हे आपल्या ताब्यातील MH ०१ DE ४२१२ या व्हेगेनर गाडीने देवगड येथे फिरण्यासाठी आले होते. देवगडहून ते सावंतवाडी येथे जात असताना कट्टा येथील धोकादायक वळणावर देवगडच्या दिशेने येणाऱ्या कोल्हापूर राधानगरी येथील भिकाजी कलाप्पा डवर MH ०९ EM ०१२२ हे आपल्या अर्टिका कारने भरधाव वेगाने देवगडकडे जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने अर्टिका कारची जोरदार धडक समोरील व्हेगेनर कारला ड्रायव्हरच्या बाजूने बसली व अपघात झाला. या अपघात व्हेगेनर कारचे मोठे नुकसान झाले.तर अर्टिका कार मधील अन्य सहकारी मात्र पसार झाले आहेत.अर्टिका कार मधील सर्व मद्य प्राशन केलेले असल्याने गाडीमध्ये प्रचंड दुर्गंधी येत होती.

अपघाताची माहिती मिळताच, देवगड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विनायक केसरकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल आशिष कदम, विजय बिर्जे, विशाल वैजल,यांनी घटना स्थळी येऊन पंचनामा केला, या अपघातातील अर्टिका कार चालक भिकाजी डवर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याच धोकादायक वळणावर १२ मे रोजी रिक्षा आणि स्कार्पिओ गाडीमध्ये भीषण अपघात होऊन रिक्षा मधील प्रवाशाचा मृत्यू झाला होता.  याच वळणावर २१ मे रोजी पुन्हा एकदा अपघात झाला असून या अपघातात जीवित हानी झालेली नाही . मात्र या वळणावर दोन्ही बाजूने गतिरोधक बसविण्यात यावे . अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!