24.5 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

हळवल भाकरवाडीसह आजूबाजूच्या परिसरातील नागरिक अंधारात

दिवसा काही वेळ लाईट ; मात्र रात्री लाईट जाण्याचे कारण काय ? नागरिकांमधून व्यक्त होतोय संताप

कणकवली | मयुर ठाकूर : तालुक्यातील हळवल येथे झालेल्या वादळी पावसामुळे ४ पोल पडून नुकसान झाले होते. त्यानंतर महावितरण विभागाने पडझड झालेली झाडे बाजूला करून विद्युत पुरवठा सुरळीत केला होता. परंतु दिवसा काही वेळ विद्युत पुरवठा सुरळीत सुरू असतो, परंतु सायंकाळी/ रात्री सतत विद्युत पुरवठा खंडित होतो. मात्र रात्री वेळीच सतत लाईट जाण्यामागे नेमकं कारण काय ? असा संतापजनक सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जातोय.

याबाबत महावितरणच्या अधिकारी कर्मचाऱ्यांशी संपर्क केला असता ट्रायल टेस्ट सुरू असल्याची कारण महावितरणच्या अधिकऱ्यांकडून देण्यात येतात. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे महावितरण विभागाचे म्हणणे असले तरी महावितरण विभागाने सुरू केलेला विद्युत पुरवठा दिवसभर सुरू राहून रात्री वेळीच खंडित का होतो. एवढा मोठा दिवस असताना रात्री वेळी कोणती ट्रायल टेस्ट घेतली जाते ? असे सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

दरवर्षी पावसाळ्यात हळवल गावातूनच वीज वितरणच्याबाबत अनेक तक्रारी असतात. कर्मचारी देखील याकडे फारसे गांभीर्याने पाहताना दिसत नाही. काही ठिकाणी नागरिकांनीच झाडांच्या फांद्या मारण्याची मागणी केली होती. मात्र कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या मागण्यांकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. त्यामुळे सतत विद्युत पुरवठा खंडित होऊ नये अशी प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.

महावितरण विभागाच्या कर्मचाऱ्यांना नेहेमीच सहकार्य मिळते. मात्र नागरिकांना विश्वासात घेऊन काम केले तर  अशा खडतर दिवसांत कोणतीही अडचण निर्माण होणार नसल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!