13 C
New York
Sunday, October 13, 2024

Buy now

कणकवलीतील उद्योजक कार्यशाळेला प्रतिसाद

कणकवली : कणकवली नगरपंचायतीच्या दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत स्थापित कनकसिंधु शहरस्तर संघ व टीम फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यामाने शहरातील बचत गटातील महिलांसाठी उद्योजक कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेचा ४५० महिलांनी लाभ घेतला.

यावेळी टीम फाऊंडेशनचे चंद्रशेखर देशमुख, सचिन मोरे, दीपक टाक, कणकवली नगरपंचायतीचे अमोल भोगले, कनकसिंधू शहर स्तर सघांचे अध्यक्ष सुचिता पालव, कार्यकारिणी सदस्य, सीएलसी व्यवस्थापक, सीआरपी उपस्थित होत्या.

कार्यशाळेत चंद्रशेखर देशमुख यांनी टीम फाऊंडेशनचे काम, या अभियानातील त्यांचा सहभाग, बाजारपेठ, मार्केटिंग, बचतगट महिला उत्पादन केलेल्या मालाला स्वतंत्र ई-मार्केटिंग प्लॅटफॉर्म कशाप्रकारे उपलब्ध करून दिला जाणार याविषयी माहिती दिली. यावेळी उद्योजक महिलांची उत्पादनाची व मार्केटिंग करणाऱ्या महिलांची नोंदणी करून घेण्यात आली. सूत्रसंचालन अमोल भोगले यांनी केले. आभार सिद्धी नलावडे यांनी मानले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!