13.9 C
New York
Sunday, October 13, 2024

Buy now

जानवली येथे ग्रामस्थांचा रस्ता रोको | ‘त्या’ कारचालकाला अटक करा ; ग्रामस्थ आक्रमक

तहसीलदार दिक्षांत देशपांडे यांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन स्थगित

मंगळवारी मुंबई – गोवा महामार्गाबाबत तहसीलदार कार्यालयात बैठक

कणकवली | मयुर ठाकूर : मुंबई-गोवा महामार्गावर जानवली गावठाणवाडी येथील पिकअप शेडच्या पुढे चालत जाणारे पादचारी अनिल कृष्णा कदम(वय ५६) यांना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली .यामध्ये अनिल कदम हे जागीच मृत्युमुखी पडले .हा अपघात शुक्रवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडला होता. मात्र २४ तास संपत आले तरी धडक देऊन पसार होणाऱ्या कारचा व कारचालकाचा मागमुस लागला नव्हता.त्यामुळे जानवलीवासीय चांगलेच आक्रमक बनले होते.शनिवारी सकाळी अकरा वाजल्यापासून वाहनचालकाला अटक न केल्याने व महामार्ग प्राधिकरणाने कोणतीही दखल न घेतल्याने संतप्त ग्रामस्थांनी मुंबई-गोवा महामार्ग रोखून धरला होता. रखरखत्या उन्हात जानवलीवासीय ठाण मांडून मुंबई- गोवा महामार्गावर बसले होते.

यावेळी महामार्गाच्या दोन्ही बाजूला साधारणपणे पाच किलोमीटर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. जोपर्यंत कार चालकाला शोधून पोलीस अटक करत नाहीत, तसेच महामार्ग प्राधिकरणवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत नाही, तोपर्यंत महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरूच ठेवणार, असा आक्रमक पवित्रा जानवली वासीयांनी घेतला होता.

अनिल कदम यांचा मृत्यू होऊन २४ तास उलटले तरी कोणतीही कार्यवाही न झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी शनिवारी सकाळी ११ वाजल्यापासून अचानक रास्ता रोको केल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली.‘ हम सब एक है’अशा घोषणा देत ग्रामस्थांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलनाची सुरुवात केली. यावेळी जानवली व आसपासच्या भागातील शेकडो ग्रामस्थ या आंदोलनात सहभागी झाले होते. 

यावेळी महामार्गाच्या दोन्ही बाजूला साधारणपणे पाच किलोमीटर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. जोपर्यंत कार चालकाला शोधून पोलीस अटक करत नाहीत, तसेच महामार्ग प्राधिकरणवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत नाही, तोपर्यंत महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरूच ठेवणार, असा आक्रमक पवित्रा जानवली वासीयांनी घेतला होता.

अनिल कदम यांचा मृत्यू होऊन २४ तास उलटले तरी कोणतीही कार्यवाही न झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी शनिवारी सकाळी ११ वाजल्यापासून अचानक रास्ता रोको केल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली.‘ हम सब एक है’अशा घोषणा देत ग्रामस्थांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलनाची सुरुवात केली. यावेळी जानवली व आसपासच्या भागातील शेकडो ग्रामस्थ या आंदोलनात सहभागी झाले होते. महामार्गावर लाकडी ओंडकी,चिरे,दगड ठेवून महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक रोखली होती.त्यामुळे गोव्याहून मुंबईकडे व मुंबईहून गोव्याकडे जाणारी सर्वच वाहतूक व्यवस्था कोलमडली होती.

जानवली येथे महामार्गावर रास्ता रोको सुरू केल्याची माहिती मिळताच कणकवली पोलीस निरीक्षक समशेर तडवी, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पाटील ,पोलीस उपनिरीक्षक बापू खरात, पोलीस हवालदार चंद्रकांत माने, रघुनाथ जांभळे, वाहतूक पोलीस हवालदार विनोद चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल किरण कदम, भूषण सुतार, राज आघाव, यांच्यासह कणकवली पोलीस व ओरोसहून दंगल नियंत्रण पथकाची टीम घटनास्थळी दाखल झाली होती.

यावेळी कणकवली तहसीलदार दिक्षांत देशपांडे यांनी घटनेची माहिती घेतली तसेच यावेळी येथील नागरिकांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या तसेच अपघात प्रकरणी कदम यांच्या नातेवाईकांना शासनाच्या माध्यमातून मदत मिळवून दिली जाईल असे आश्वासन देखील त्यांनी दिले. तसेच अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी किंवा त्या अनुषंगाने महामार्ग प्राधिकरण ठेकेदार कंपनी यांच्या समवेत बैठक होण्यासाठी तोडगा काढू अशी ग्वाही तहसीलदार दिक्षांत देशपांडे यांनी दिली.

पुढे ते म्हणाले, मंगळवारी १२ वाजता तहसीलदार कार्यालय कणकवली येथे बैठक घेतली जाईल. यावेळी मुंबई – गोवा महामार्गाबाबत कणकवली तालुक्यात असलेले प्रश्न व समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील. हळवल फाटा येथील हायमास्टच्या मागणीबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्यात आले असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. तहसीलदार कार्यालयात होणाऱ्या बैठकीत ग्रामस्थ सरपंच यांनीही उपस्थित राहावे, असे आवाहन देखील तहसीलदार दिक्षांत देशपांडे यांनी केले. पोलीस प्रशासनाने देखील ग्रामस्थांना लवकरात लवकर फरार कार चालकाला शोधून काढून कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले.

दरम्यान जानवली सरपंच अजित पवार म्हणाले की, तात्पुरत्या स्वरूपात आम्ही हे रास्ता रोको आंदोलन स्थगित करत आहोत. मात्र जर आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर, यापुढे न सांगता पूर्ण पंचक्रोशीतील ग्रामस्थ एकत्र येऊन आंदोलन करणार. तहसीलदार दिक्षांत देशपांडे यांनी दिलेल्या आश्वासनामुळे व अनिल कदम यांच्या कुटुंबीयांनी सांगितल्यामुळे हे आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करत आहोत. त्यामुळे येणाऱ्या मंगळवारच्या आत प्रशासनाने रिपोर्ट देऊन संबंधीत कार चालकावर गुन्हा दाखल करावा. मात्र दिलेल्या शब्दाची पूर्तता झाली नाही तर, न सांगता रास्ता रोको आंदोलन होईल आणि त्याला सर्वस्वी जबाबदार पोलीस प्रशासन व इतर प्रशासन असणार आहे, असेही सरपंच श्री पवार म्हणाले.

महामार्गावर लाकडी ओंडकी,चिरे,दगड ठेवून महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक रोखली होती.त्यामुळे गोव्याहून मुंबईकडे व मुंबईहून गोव्याकडे जाणारी सर्वच वाहतूक व्यवस्था कोलमडली होती.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!