संपादकीय | मयुर ठाकूर : कणकवली तालुक्यात गुरुवारी दुपारी पाऊस व वादळी वारे झाले. मात्र जर पाहिलं तर महावितरण विभागाचे पावसाळा पूर्व नियोजन असते तर झाडांच्या फांद्या किंवा झाडे तुटून विद्यूत वाहिन्या तुटून फार मोठे नुकसान झाले नसते. मात्र पहिल्याच वादळ पावसात महावितरण विभागाचा भोंगाळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
पावसाळापूर्व नियोजन नसल्याने गुरुवारी झालेल्या वादळ व पावसामुळे हळवल, शिरवल, हरकुळ, कळसुली परिसरातील घरे अंधारात आहेत. काही ठिकाणी अनेक वेळा पोल बदलण्याबाबत निवेदने दिली होती. मात्र कायद्याचा धाक दाखवणाऱ्या महावितरण विभागाने निवेदने घेऊन केवळ आश्वासने व जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्याचे काम मात्र केले.