3.5 C
New York
Wednesday, November 13, 2024

Buy now

कणकवली समर्थनगर येथील विहिरीत अज्ञाताचा मृतदेह

कणकवली : शहरातील समर्थनगर येथील विहिरीत बुधवारी अज्ञाताचा मृतदेह आढळून आला. या घटनेबाबत तेथील जमीन मालक संजय गणेश हर्णे यांनी कणकवली पोलिस ठाण्यात खबर दिली. बुधवारी सकाळी साडे ९:३० वा. च्या सुमारास समर्थनगर येथील श्री. हर्णे यांच्या मालकीच्या विहिरीमध्ये सकाळी ९:३० वा.च्या सुमारास काही कामगार पाणी आणण्यासाठी गेले होते. त्‍यावेळी त्‍यांना पुरूष जातीचा मृतदेह तरंगताना आढळून आला. याबाबतची माहिती पोलिसांना दिल्‍यानंतर कणकवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मृतदेह उपजिल्‍हा रूग्‍णालयातील शवागरात पाठविण्यात आला. हा मृतदेह ४० ते ४५ वयोगटातील तरूणाचा आहे. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत ओळख पटलेली नाही. या घटनेचा अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!