कणकवली : तालुक्यातील नाटळ येथील तंटामुक्ती अध्यक्ष गणेश मारुती सावंत हे गावात तसेच समाजा – समाजामध्ये भांडणे लावण्याची काम करत असून गावातील नागरिकांना दारू पिऊन शिवीगाळ करतात. तसेच ग्रामसभेवेळी ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन दंगा करणे, धमकी देणे, त्यांना कोणी काही बोलले की पूर्ण सावंत समाजाला बोलले अस खोटं भासवून समाजाला बोलले अस खोटं भासवून सावंत समाजाला भडकवून सोडतो. याबाबत योग्य ती दखल घेऊन तंटामुक्ती अध्यक्ष गणेश मारुती सावंत यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन बुधवारी कणकवली पोलीस ठाण्यात देण्यात आले.
यावेळी नाटळ सरपंच सुनिल घाडीगावकर, उपसरपंच पंढरीनाथ तायशेटये, सत्यवान सुतार, सुरेश खांदारे, दिनानाथ सावंत, रविंद्र सुतार, अनिल नाटळकर, प्रसाद पाताडे, गोपाळ कुडतरकर, विकास पांचाळ, प्रविण नाटळकर, राजेश घाडीगावकर, शशिकांत सावंत, अनिल राजाराम सावंत हे यावेळी उपस्थित होते.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, गणेश सावंत हे उभ्या वाहनांची हवा काढणे, कार्यक्रमांचे बॅनर फाडणे, लोकांची कुंपण तोडणे त्याचप्रमाणे मी नाटळचा पटेल आहे असे सांगून इतर समाजातील लोकांना धमकी देणे. ५/५/२०२४ रोजी संध्याकाळी ०७.३० च्या सुमारास किशोर विठ्ठल परब व महेश महादेव खांदारे यांच्या घरी ३०- ४० जणांचा जमाव घेऊन लाट्या बुक्क्यांनी दरवाजा ठोकून त्यांच्या महिलांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे गणेश सावंत व त्या ३०-४० जणांच्या जमावापासून त्या दोन कुटुंबानां धोका आहे, असे निवेदन बुधवारी कणकवली पोलीस ठाण्यात देण्यात आले.